पुणे : प्रख्यात गुंड शरद मोहोळच्या लग्नाचा शुक्रवारी वाढदिवस होता आणि त्याचदिवशी त्याच्या आयुष्याची दोरी कापली गेलीय. एका मागून एक अशा चार गोळ्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूडच्या भागात झाडण्यात आल्या. त्यात शरद मोहोळचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर संपुर्ण पुणे शहर हादरून गेलं अन् पुन्हा गॅंगवारची चर्चा पुण्यात सुरू झाली. शरद मोहोळ याच्या मारेकऱ्यांना अटक केल्यानंतर संपुर्ण प्रकरणाची माहिती समोर आली आहे. त्याआधी शरद मोहोळ याच्या हत्याची घटनासमोर समोर आला आहे.
हेही वाचा…“जो उमेदवार जिंकणार त्याला जागा देणार”, लोकसभेसाठी ठाकरेंचा फॉर्म्युला ठरला
शरद मोहोळ आपल्या लग्नाचा वाढदिवस कोथरूडच्या सुतारदरा भागात साजरा केला जात होता. जामीनावर बाहेर आलेल्या शरद मोहोळचा काटा काढला जाईल असं काहीही वाटत नव्हतं. सुतारदरा भागातील घरातून लग्नाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर शरद मोहोळ त्याचे बॉडीगार्ड विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे आणि साहील पोळेकर हे घराबाहेर पडले. शरद मोहोळ घरातून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावर साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत लागल्या. तर एक छातीत तर एक गोळी शरद मोहोळच्या डोक्यात लागली. यानंतर शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. अन् आरोपींना त्याठिकाणांहून धुम ठोकली. यावेळी त्याठिकाणी एकच गोंधळ निर्माण झाला.
हेही वाचा…शरद मोहोळची ह’त्या का केली? कारण आलं समोर, पोलिसांनीही आरोपींना फिल्मी स्टाईने पकडलं
गोळ्या झाडणारे तीन मारेकरी नामदेव कानगुडे या त्यांच्या आणखी एका साथीदारालासह सुतारदरा भागातून पळाले. त्यांचे आणखी चार साथीदार त्यांच्यासाठी एक स्विप्ट कार आणि एक एक्स व्ही यु गाडी घेऊन हजर होते. शरद मोहोळवर हल्ला झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. अन् त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. यातच शरद मोहोळ याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी शरद मोहोळला मृत्य घोषीत केले. यामुळे रूग्णालयात जवळपास चारशे ते पाचशे जणांचा जमाव गोळा झाला. त्यानंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त त्याठिकाणी तैनात करण्यात आला.
यातच शरद मोहोळवर हल्ला करणाऱ्या तीन आरोपींपैकी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकरचे नाव समोर आले. आर्थिक आणि जामिनीच्या वादातून शरद मोहोळ याचा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. यातच पुण्यातील खेड शिवापूर जवळील भागात लपून बसलेल्या तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर या प्रकरणातीतल मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याला देखील पोलिसांनी अटक केली.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! “..म्हणून योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची दिली धमकी, “आरोपीला ठाण्यात पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा…शरद मोहोळ याच्या ह’त्ये’ची’ इनसाईड स्टोरी ; ह’त्ये’चा कट काही वर्षापासून शिजत होता
हेही वाचा..मावळ अन् शिरूर लोकसभेवरून महायुतीत पेच वाढला, राजकीय हालचालींना वेग
हेही वाचा…एकनाथ शिंदे आज लोकसभेचं रणशिंग फुंकणार, मावळात अन् शिरूरमध्ये सभा, विरोधकांमध्ये धडकी भरली
हेही वाचा..शरद मोहोळचा गेम कुणी केला ? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले..