नवी दिल्ली : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवेठार मारण्याची धमकी देणाऱ्या दोन तरूणांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी महाराष्ट्रातील ठाणे शहरात लपून बसल्याची माहिती मिळताच देवरिया पोलिसांनी ठाणे पोलिसांच्या मदतीने अजीत कुमार यादवा याला अटक केली आहे. त्यानंतर त्याला विमानाने गोरखपुरला घेऊन गेले आहेत. गोरखपुरचे पोलीस अधिक्षक संकल्प शर्मा यांनी याची माहिती दिली आहे.
हेही वाचा…शरद मोहोळची ह’त्या का केली? कारण आलं समोर, पोलिसांनीही आरोपींना फिल्मी स्टाईने पकडलं
योगी आदित्यनाथ यांना एक्सवरून अजीत कुमार यादवे जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या तरूणाच्यासंदर्भात शोध मोहिम रावबत त्याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. रूदपुर तालुक्यामधील फतेहपूर गावातील सामूहिक हत्याकांड प्रकरणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांच्या सुनावणीनंतर तहसीलदार न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवत आरोपींचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे या आरोपीने थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
हेही वाचा..ठाकरेंनी पदावरून हाकललं, ठाकरेंचा ‘हा’ शिवसैनिक पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला
दरम्यान, रूदपूर तहसीलदार न्यायालयाने उत्तर प्रदेश महसूल संहिता २००६ च्या कलम ६७ नुसार आरोपी प्रेमचंद याच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. तसेच त्याच्या घरावर कारवाई केली जाणार होती.त्यानंतर प्रेमचंद याच्या बाजूने जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु जिल्हा दंढादिकाऱ्यांनी ही याचिका फेटाळली. त्यामुळे संतापलेल्या अजित कुमार यादव या तरूणाने एक्सवरून थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
READ ALSO :
हेही वाचा…शरद मोहोळ याच्या ह’त्ये’ची’ इनसाईड स्टोरी ; ह’त्ये’चा कट काही वर्षापासून शिजत होता
हेही वाचा..मावळ अन् शिरूर लोकसभेवरून महायुतीत पेच वाढला, राजकीय हालचालींना वेग
हेही वाचा…एकनाथ शिंदे आज लोकसभेचं रणशिंग फुंकणार, मावळात अन् शिरूरमध्ये सभा, विरोधकांमध्ये धडकी भरली
हेही वाचा..शरद मोहोळचा गेम कुणी केला ? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले..
हेही वाचा…“जो उमेदवार जिंकणार त्याला जागा देणार”, लोकसभेसाठी ठाकरेंचा फॉर्म्युला ठरला