सिंधुदूर्ग : सिंधूदूर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून कुणी लढायचं ? यावरून महायुतीत राजकीय शिमगा सुरू आहे. महायुतीमधून या जागेवर भाजपने दावा सांगितला असून मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सावंत देखील याठिकाणी निवडणुक लढण्यास इच्छूक आहेत. यातच आता किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या बॅनरवरून रत्नागिरी- सिंधुदूर्ग लोकसभा जागेवरून शिंदे गट अन् भाजपमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…कुख्यात गुंड ”शरद मोहोळ”च्या ह’त्ये’ची चित्तथरारक काहाणी, आतापर्यंत काय काय घडलं ? वाचा सविस्तर
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने मिशन ४५ जिंकण्याचा संकल्प ठेवला आहे. यातच निवडणुकीच्या आधीच जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. सिंधुदूर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपली उमेदवारी अगोदरच जाहीर केलीय. तर ही जागा शिवसेनेची असून ती आम्हालाच मिळायला हवी. अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. यातच उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनर लागले असून त्यावर किंगमेकर तसेच भावी खासदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी तसेच टोलनाक्यावर बॅनर लागले आहेत. त्यामुळे याची एकच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! “..म्हणून योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची दिली धमकी, “आरोपीला ठाण्यात पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दरम्यान, सिंधूदूर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आहेत. तर विनायक राऊतांच्या विरोधात याठिकाणी भाजप आपला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. पंरतु या जागेवर अगोदरच शिंदे गटाने दावा सांगितला आहे. त्यामुळे महायुतीच आता मोठा पेच निर्माण झाला असून जागावाटपात ही जागा कुणाच्या वाट्याला येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा“हेच दिल्लीश्वरांना सतत खुपत आलंय”, राज ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल
हेही वाचा“हेच दिल्लीश्वरांना सतत खुपत आलंय”, राज ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल
हेही वाचा…“मयतासोबतच आरोपींचा २५ दिवसांपासून वावर, कट रचला अन्..” शरद मोहोळ ह’त्या’प्रकरणी पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती
हेही वाचा.२२ जानेवारीला कोण कोण जाणार ? कुणाला निमंत्रण ? उद्धव ठाकरे २२ जानेवारीला काय करणार ?
हेही वाचा…घरात एकत्र जेवण केलं अन् बाहेर काढला काटा ; शरद मोहोळच्या ह’त्ये’चा’ सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर