पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर काल त्याच्याच साथीदारानी गोळ्या झाडल्या. त्यानंतर शरद मोहोळ रक्ताच्या थोराळ्यात जागीच खाली पडला. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत्य घोषीत केले. यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली असता या प्रकरणी आठ जणांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी साहिल मुन्ना उर्फ पोळेकर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकची माहिती दिली आहे.
हेही वाचा..मावळ अन् शिरूर लोकसभेवरून महायुतीत पेच वाढला, राजकीय हालचालींना वेग
शरद मोहोळ याच्याभोवती मागील काही दिवसापासून त्याचे साथीदार फिरत होते. त्यानंतर कोथरूड येथील परिसरात तीन आरोपींनी शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. मुख्य आरोपी साहिल मुन्ना पोळेकर त्याचा मामा नामदेव कानगुडे, तर दुसरा नातेवाईत विठ्ठल गांजले या दोघांसोबत शरद मोहोळचं वैमन्यरस्य होतं. त्यातूनच मोहोळची हत्या करण्यात आली आहे. याचा पुढचा तपास सुरू आहे. असे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदे आज लोकसभेचं रणशिंग फुंकणार, मावळात अन् शिरूरमध्ये सभा, विरोधकांमध्ये धडकी भरली
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात आठ जणांना पोलिसांनी शिरवळ येथून अटक केली आहे. यामध्ये दोन जण वकिल देखील होते. या वकिलांचा संबंध काय? ते कशासाठी गेले होते ? याचा तपास सुरू आहे. मुन्ना पोळेकर हा आरोपी त्याच परिसरात राहत आहे. वर्ष सहा महिन्यापासून तो त्या परिसरात राहत होता. परंतु गेल्या पंचवीस ते तीस दिवसापासून तो त्यांच्या जास्त संपर्कात आला होता. आरोपींकडून तीन पिस्टल जप्त करण्यात आले आहे. तसेच कानगुडे याच्यावर आणि पोळेकर याच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. असेही माहिती पोलिसांनी दिली आहे.
तसेच नामदेव कानगुडे हा त्याच परिसरात राहत होता. परंतु त्यानंतर तो भुगावला राहायला गेला होता. पोळेकर आणि शरद मोहोळ यांचं दोघंही घर जवळच आहे. पोळेकर आणि कानगुडे दोघेही नातलग असून मागच्या भांडणाचा राग त्यांनी शरद मोहोळ याच्यावर काढला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा.२२ जानेवारीला कोण कोण जाणार ? कुणाला निमंत्रण ? उद्धव ठाकरे २२ जानेवारीला काय करणार ?
हेही वाचा…घरात एकत्र जेवण केलं अन् बाहेर काढला काटा ; शरद मोहोळच्या ह’त्ये’चा’ सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर
हेही वाचा…कुख्यात गुंड ”शरद मोहोळ”च्या ह’त्ये’ची चित्तथरारक काहाणी, आतापर्यंत काय काय घडलं ? वाचा सविस्तर
हेही वाचा…मोठी बातमी..! “..म्हणून योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची दिली धमकी, “आरोपीला ठाण्यात पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा…शरद मोहोळ याच्या ह’त्ये’ची’ इनसाईड स्टोरी ; ह’त्ये’चा कट काही वर्षापासून शिजत होता