पुणे : कुख्यात गॅगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील ६ आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणासंदर्भात कोर्टाने मुख्य आरोपींसह ६ आरोपींना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २ वकिलांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल दुपारी कोथरूडच्या भागात शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली.
हेही वाचा…“मयतासोबतच आरोपींचा २५ दिवसांपासून वावर, कट रचला अन्..” शरद मोहोळ ह’त्या’प्रकरणी पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती
शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा उलगडा आज आज प्रभारी सह आयुक्त आणि अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषद घेऊन उघड केला. शरद मोहोळ हत्याच्या पाठीमागे त्याचा साथीदार साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे आणि विठ्ठल गडले असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. तसेच पुर्वीचा राग मनात धरून तीन आरोपींना शरद मोहोळ याच्यावर गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या सर्व आरोपींना शिरवळ जवळ पकडण्यात आले. त्यानंतर त्यांना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा…२२ जानेवारीला कोण कोण जाणार ? कुणाला निमंत्रण ? उद्धव ठाकरे २२ जानेवारीला काय करणार ?
दरम्यान, शरद मोहोळ याची हत्या पुर्वनियोजित होती. आरोपी मुन्ना पोळेकर मागील काही दिवसापासून शरद मोहोळ याच्यासोबत फिरत होता. यातच शरद मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवसाचं निमित्त साधून त्याची हत्या करण्यात आली. तर यामध्ये आरोपी मुन्ना पोळेकर व त्याचा मामा नामदेव कानगुडे तसेच विठ्ठल गडले यांचं पुर्वीपासून वैमनस्व होतं. त्यामुळे मागील काही वर्षाचा राग नामदेव कानगुडे यांनी मनात ठेऊन आणि मुन्ना पोळेकर याला मोहरं बनवून शरद मोहोळची हत्या करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाची अधिकची माहिती आता पोलिस तपास करीत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेच्या ४८ जागांपैकी मनसेच्या १४ उमेदवारांची यादी जाहीर ; राज ठाकरेंचे शिलेदार अनेकांना धक्का देणार
हेही वाचा..मावळात पार्थ पवार तर शिरूरमधूनही आपला उमेदवार असणार, मग शिंदे जाहीर सभा का घेताहेत? अजित पवार म्हणाले….
हेही वाचा…तळ कोकणात जागावाटपावरून महायुतीत राजकीय शिमगा ; सिंधूदूर्ग-रत्नागिरी लोकसभेवरून मोठी रस्सीखेच
हेही वाचा“हेच दिल्लीश्वरांना सतत खुपत आलंय”, राज ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल
हेही वाचा“हेच दिल्लीश्वरांना सतत खुपत आलंय”, राज ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल