सोलापूर : ओबीसींना खिंडीत गाठलं असून आरक्षण संपवण्याचा मोठा डाव आखला आहे. त्यामुळे आरक्षण वाचवण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायला हवं. आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं एका बाजूला बोलायचं अन् दुसऱ्या बाजूला सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटून द्यायची. अशी टिका करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. पंढरपुरात आज ओबीसी नेत्यांची जाहीर सभा होत आहे. त्या सभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील अनेक ओबीसी नेते हजर आहेत. त्यावेळी गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा..“हेच दिल्लीश्वरांना सतत खुपत आलंय”, राज ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल
राज्यात आज जी कुणबीची प्रमाणपत्र वाटली आहेत. त्यात आम्हाला शंका आहे. छगन भुजबळांनी यासंदर्भात पुरावा देखील दिला होता. शाळेतील जन्माचा दाखला भुजबळांनी दिलाय. मोकळ्या जागा आहेत. त्याठिकाणी पेनाने जातीचा उल्लेख केला जातोय. त्यामुळे सरकारने शिंदे समिती बरखास्त करा आणि जे कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत काढली आहेत. त्याचं ऑडिट काढा, त्याची श्वेतपत्रिका काढा. अशी मागणी देखील गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. हे सर्व जाणून घेण्यासाठी आम्हाला अधिकार द्या. त्यानंतर कळेल की कोणती खरी आणि कोणती खोटी प्रमाणपत्र आहेत. असेही पडळकर म्हणाले.
हेही वाचा…“मयतासोबतच आरोपींचा २५ दिवसांपासून वावर, कट रचला अन्..” शरद मोहोळ ह’त्या’प्रकरणी पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती
दरम्यान, तुम्हाला जर आरक्षण द्यायचं असेल तर महाराष्ट्रातील जमीन आणि संपत्तीचं समान वाटप करा. मग आम्हाला कशाला आरक्षण लागणार ? ओबीसींचं आरक्षण रद्द करा अशी कोर्टात केस सुरू आहे. याच्यापाठीमागे कोणती लोकं आहेत? त्यामुळे एका बाजूला ओबीसीमधून आरक्षण द्या अशी मागणी करताहेत. तर दुसऱ्या बाजूला आरक्षण संपवण्यासाठी प्रयत्न केले जातात. असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा..मुन्ना पोळेकराला मोहरा बनवला, ‘शरद मोहोळ’ हत्या प्रकरणाचा खरा मास्टर माईंड आला समोर
हेही वाचा…लोकसभेच्या ४८ जागांपैकी मनसेच्या १४ उमेदवारांची यादी जाहीर ; राज ठाकरेंचे शिलेदार अनेकांना धक्का देणार
हेही वाचा..मावळात पार्थ पवार तर शिरूरमधूनही आपला उमेदवार असणार, मग शिंदे जाहीर सभा का घेताहेत? अजित पवार म्हणाले….
हेही वाचा…तळ कोकणात जागावाटपावरून महायुतीत राजकीय शिमगा ; सिंधूदूर्ग-रत्नागिरी लोकसभेवरून मोठी रस्सीखेच
हेही वाचा“हेच दिल्लीश्वरांना सतत खुपत आलंय”, राज ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल