पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने अबकी बार ४०० पार अशी घोषणा केली असली तर भाजपने ३५० खासदार निवडणून आणण्याचं लक्ष ठेवलं आहे. यासाठी भाजपने प्रत्येक राज्यात तशी रणनीती आखली आहे. यातच काल राष्ट्रीय संघटनात्मक पातळीवर चर्चा करण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत गंभीर चर्चा करण्यात आली आहे.
हेही वाचा…लोकसभेच्या ४८ जागांपैकी मनसेच्या १४ उमेदवारांची यादी जाहीर ; राज ठाकरेंचे शिलेदार अनेकांना धक्का देणार
भाजपने लोकसभेसाठी वेगळी रणनिती आखली आहे. जास्तीत जास्त तरूण उमेदवारांना निवडणुकीत उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. यासाठी ४० ते ५५ वर्षाच्या उमेदवारांना भाजप निवडणुकीत उतरवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जवळपास १४५ पेक्षा जास्त तरूण चेहऱ्यांना भाजप निवडणुकीत उतरवणार आहे. यातच ज्या विद्यमान खासदारांचं भाजप तिकीट कापणार. त्यांना पक्षसंघनेत मोठी जबाबदारीही देण्यात येणार आहे.
हेही वाचा…मावळात पार्थ पवार तर शिरूरमधूनही आपला उमेदवार असणार, मग शिंदे जाहीर सभा का घेताहेत? अजित पवार म्हणाले….
दरम्यान. रविवारी पुण्यात भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय संघटक सरचिटणीस बी एल संतोष, सहसंघटक मंत्री शिव प्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांच्यासह शहरातातील भाजपचे नेते उपस्थित होते. यातच राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच बैठकीचे निमंत्रण दिले होते. भाजपकडून सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका घेणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जोपर्यंत मी जितेंद्र आव्हाड यांना भेटत नाही”, कर्करोगाशी लढणाऱ्या तरूणाने आव्हाडांसमोर ठेवली ‘ही’ इच्छा
हेही वाचा…लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला “चैतन्यस्पर्श” अभूतपूर्व सोहळा, दिग्गजांची हजेरी,भाविकांची मोठी गर्दी
हेही वाचा“ओबीसींना खिंडित गाठलंय, शिंदे समिती बरखास्त करा,” गोपीचंद पडळकरांचा सरकारला घरचा आहेर
हेही वाचा..“ओबीसींना खिंडित गाठलंय, शिंदे समिती बरखास्त करा,” गोपीचंद पडळकरांचा सरकारला घरचा आहेर
हेही वाचा..मुन्ना पोळेकराला मोहरा बनवला, ‘शरद मोहोळ’ हत्या प्रकरणाचा खरा मास्टर माईंड आला समोर