सोलापूर : शरद मोहोळ हिंदू असल्यानं त्याला ठार करण्यात आल्याचं वादग्रस्त विधान भाजप आमदार टी राजा सिंग यांनी केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यातच शरद मोहोळ याने तुरूंगात असताना जिहाद्याला मारून ७२ हुरांकडे पाठवण्याचे कामही केलं असल्याचं म्हणत टी राजा सिंग यांनी शरद मोहोळ याच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. त्यामुळे या वक्तव्यामुळे आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे. सोलापुरात भाजपकडून हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“जोपर्यंत मी जितेंद्र आव्हाड यांना भेटत नाही”, कर्करोगाशी लढणाऱ्या तरूणाने आव्हाडांसमोर ठेवली ‘ही’ इच्छा
शरद मोहोळ याची पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यावरून टी राजा यांनी भाष्य केले आहे. शरद मोहोळ याने हिंदू देव धर्म, आणि देशासाठी आयुष्य वेचलवं. तुळजाभवानी माते त्याला आपल्या चरणी जागा देवो आणि त्याला पुनर्जन्म देऊन पुन्हा हिंदू धर्माच्या रक्षणासाठी पाठवावं, असे तेलंगणातील भाजपचे आमदार टी. राजा यांनी सांगितले आहे. शरद मोहोळ हा देशभक्त होता. त्याने येरवडा कारागृहात एका दहशतवाद्याला ठार मारले होते. त्याची पत्नीसुद्ध हिंदू धर्मसाठी काम करतेय. ती सोलापूरात हिंदू जन आक्रोश सभेला येणार होती. परंतु हिंदू धर्मातील गद्दारांनी शरद मोहोळची हत्या केली. या गद्दारांना ओळखा. असेही त्यांनी सांगितले. तसेच शरद मोहोळ आणि आपण यापुर्वी शिर्डीजवळ श्रीरामजवळ हिंदू जन जागरण सभा घेतली होती. अशी आठवणही त्यांनी करून दिली.
हेही वाचा…लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला “चैतन्यस्पर्श” अभूतपूर्व सोहळा, दिग्गजांची हजेरी,भाविकांची मोठी गर्दी
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहाद, वप्फ बोर्ड या सर्व बाबतीत विचार करण्याची गरज आहे. या मोर्चाच्या निमित्ताने आम्हाला झोपलेल्या हिंदूंवना जागं करायचं आहे. आजचे हिंदू कुंभकर्ण होत चाललेय. इथल्या हिंदूची रक्षा करण्यासाठी आम्ही हैदराबादमधून यायचं का ? तुम्हाला स्वत: ची रक्षा स्व; त करावी लागेल. कोणी विचारलं कुठल्या जातीचे तर त्यांना सांगा आम्ही हिंदू आहोत. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेसाठी काॅंग्रेसने इच्छुकांचे मागितले अर्ज ; पुणे लोकसभेसाठी ‘या’ नेत्यांची जोरदार चर्चा
हेही वाचा…अजितदादा अन् शिंदेंच्या वादात भाजपचा गेम होणार ? लोकसभेच्या जागांवरून महायुतीत वादाची ठिणगी
हेही वाचा…पोलिस दलात खळबळ माजवून देणारी बातमी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ८ महिला पोलिसांवर कार्यालयातच ब’ला’त्का’र
हेही वाचा..“फडणवीसांच्या गळ्यात सध्या दिल्लीचा गुलामीचा पट्टा “, ठाकरे गटाचा जोरदार पलटवार
हेही वाचा..भाजपने लोकसभेसाठी वेगळी रणनिती आखली, ४० ते ५५ वर्षाच्या उमेदवारांना भाजप मैदानात उतरवणार