पुणे : कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळचा पाच जानेवारीला कोथरूड परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणाबाबत शरद मोहोळचे साथीदार व मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. तर यामध्ये दोन वकिलांचाही समावेश आहे. शरद मोहोळच्या हत्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. यातच काल शरद मोहोळच्या पत्नीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेऊन न्याय मिळावा अशी विनंती केली होती. यातच आता भाजपचे आमदार नितेश राणे देखील मोहोळ कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
हेही वाचा…मुंबई हादरलं..! उपायुक्त व दोन पोलिस निरीक्षकांकडून ८ महिला शिपायांवर ब’ला’त्का’र ; निष्क्रिय गृहमंत्री, विरोधकांची फडणवीसांवर टिका
काल शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन मला न्याय मिळावा, अशी विनंती केली आहे. स्वाती मोहोळ या भाजप पुणे शहर महिला आघाडीच्या पदाधिकारी असून त्यांनी २०२२ साली भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा झाली होती. यावेळी चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यावरून जोरदार टिका करण्यात आली होती. यातच आता नितेश राणे मोहोळ कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यामुळे यावरून आता काय राजकीय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा..“हिंदू धर्मातील गद्दारांनी शरद मोहोळची हत्या केली”, भाजपच्या आमदाराच वादग्रस्त विधान
दरम्यान, शरद मोहोळ हिंदू असल्यानं त्याला ठार करण्यात आल्याचं वादग्रस्त विधान भाजप आमदार टी राजा सिंग यांनी केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यातच शरद मोहोळ याने तुरूंगात असताना जिहाद्याला मारून ७२ हुरांकडे पाठवण्याचे कामही केलं असल्याचं म्हणत टी राजा सिंग यांनी शरद मोहोळ याच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. त्यामुळे या वक्तव्यामुळे आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे. सोलापुरात भाजपकडून हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते..
READ ALSO :
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला पुर्णविराम, हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती
हेही वाचा“‘रक्षणकर्ते’ हेच जर ‘शोषणकर्ते’ होत असतील तर..” मुंबईच्या घटनेवरून आव्हाडांनी व्यक्त केला संताप
हेही वाचा…लहू बालवडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘भव्य भजन स्पर्धा’ ; चंद्रकांत पाटलांच्या उपस्थित पार पडला बक्षिस वितरणाचा सोहळा
हेही वाचा…रोखठोक भूमिका घेणारे किरण मानेंचा ठाकरे गटात प्रवेश, मनसेच्या ‘या’ नेत्यांनीही ठाकरेंची वाट धरली
हेही वाचा…सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला मोठा दणका, बिल्किस बानोच्या आरोपींच्या सुटकेचा निर्णय रद्द