मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर बुधवारी दुपारी चार वाजता निकाल लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे कामकाज जवळपास पुर्ण केले असून त्यांच्या या निकालाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. १४ सप्टेंबर ते २० डिसेंबर दरम्यान राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र याचिकेवर मॅरेथॉन सुनावणी घेतली आहे. यातच सुमारे ५०० पानांचे निकालपत्र तयार झाले असून शिवसेनेच्या कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला पुर्णविराम, हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती
शिवसेनेच्या निकालाआधी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुप्त बैठक घेतली. त्यात शिंदे सरकार कोसळले तर काय यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला भाजपचे आमदार आणि काही पदाधिकारी मिळून फक्त ७० लोक होते. त्यातही सोबत कोणालाही घेऊन येऊ नये. असे पदाधिकाऱ्यांना व आमदारांना सांगण्यात आले होते. त्यामुळे या बैठकीला काही आमदार स्वत: च्या वाहनाने तर काहीजण पुण्यातील सर्किट हाऊसच्या गाड्या लावून प्रवासी वाहतुकीच्या भाड्याच्या वाहनांनी बैठकस्थळी पोहोचल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“‘रक्षणकर्ते’ हेच जर ‘शोषणकर्ते’ होत असतील तर..” मुंबईच्या घटनेवरून आव्हाडांनी व्यक्त केला संताप
दरम्यान, अपात्र आमदारांच्या यादित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. शिंदे गटाच्या विरोधात निकाल गेा तर शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाऊ शकते. सरकार कोसळू शकते. राजकीय उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. या सर्व शक्यता गृहीत धरून भाजपच्या बैठका सुरू आहेत. फडणवीस यांनी आमदार पदाधिकाऱ्यांची हॉटेलमध्ये गुप्त बैठक घेतली. शिवसेनेतील शिंदे गटाचे आमदार अपात्र होण्याची शक्यता असून १५ फेब्रुवारीपर्यंत लोकसभेची आचारसंहिता लागणार असल्यावरही चर्चा झाल्याचे एका आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बीड जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार, ५४ पदाधिकारी शिंदे गटात दाखल
हेही वाचा..“पहिला भुंकप राहुल नार्वेकर राज्यात करतील,” शिवसेना अपात्र याचिका प्रकरणावर माजी मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक विधान
हेही वाचा…२० जानेवारीला आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊ नका”, भाजपच्या खासदारांचं मोठं विधान, वाद पेटणार
हेही वाचा…२० जानेवारीला आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊ नका”, भाजपच्या खासदारांचं मोठं विधान, वाद पेटणार
हेही वाचा…गुंड शरद मोहोळच्या कुटुंबियांची नितेश राणे भेट घेणार, राजकीय वर्तुळात एकच चर्चा