मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक जण पक्षप्रवेश करतांना दिसत आहेत. तर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अनेक जण राजकारणात येणाचा मार्ग निवडतांना दिसत आहेत. यातच आता मुलगी झाली हो मालिका व बिग बॉस मराठी या कार्यक्रमामुळे चर्चेत आलेले अभिनेते किरण माने यांनी राजकारणात एंट्री केली आहे. किरण माने यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. तर दुसऱ्या बाजूला बीडमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे.
हेही वाचा…“‘रक्षणकर्ते’ हेच जर ‘शोषणकर्ते’ होत असतील तर..” मुंबईच्या घटनेवरून आव्हाडांनी व्यक्त केला संताप
बीड जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. ५४ पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. परळीत याबाबत पत्रकार परिषद घेऊन या पदाधिकारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काही जणांना विचारात न घेता निवडी करण्यात आल्या आहेत ते ही पदाधिकारी शिंदे सेनेत जाणार आहेत. काही दिवसांपुर्वी उद्धव ठाकरे शिवसेनेतील पदाधिकारी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे असे जिल्हाप्रमुख सचिन मुळक यांनी सांगितले.
हेही वाचा…लहू बालवडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘भव्य भजन स्पर्धा’ ; चंद्रकांत पाटलांच्या उपस्थित पार पडला बक्षिस वितरणाचा सोहळा
दरम्यान, काल मातोश्रीवर पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात किरण माने यांच्यासह अनेकांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यामध्ये घाटकोपर येथील मनसे उपविभाग अध्यक्ष निलेश जंगम आणि महिला उपविभाग अध्यक्षा मेघा सावंत यांनी देखील शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला तर बीड जिल्ह्यातील गजानन कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राहण्याची भूमिका घेतली आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“पहिला भुंकप राहुल नार्वेकर राज्यात करतील,” शिवसेना अपात्र याचिका प्रकरणावर माजी मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक विधान
हेही वाचा…२० जानेवारीला आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊ नका”, भाजपच्या खासदारांचं मोठं विधान, वाद पेटणार
हेही वाचा…२० जानेवारीला आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊ नका”, भाजपच्या खासदारांचं मोठं विधान, वाद पेटणार
हेही वाचा…गुंड शरद मोहोळच्या कुटुंबियांची नितेश राणे भेट घेणार, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला पुर्णविराम, हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती