मुंबई : शिवसेना आमदार अपात्र याचिकांवरील निकालाच्या आधीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज सकाळीच ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर इडीने छापा टाकला आहे. मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या ५ स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा रविंद्र वायकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला सकाळीच ईडीने ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरी छापा टाकला. यातच आता ठाण्यातील ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या दोन्ही शिलेदारांच्या केंद्रीय तपास यंत्रणेंकडून अशी कारवाई केली जात असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालाआधी ठाकरेंना मोठा धक्का, आमदार रविंद्र वायकरांच्या घरी इडीचा छापा
ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर जोगेश्वरी भुखंड संदर्भात ईडीने छापा टाकला. आज सकाळीच दहा ते पंधरा अधिकारी वायकरांच्या घरी पोहचले. त्यांच्या घराची आता ईडीकडून चौकशी सुरू आहे. तर यातच आता खासदार राजन विचारे यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली आहे. राजन विचारे यांच्या घरावर अशा पद्धतीने धाड टाकल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र प्रकरण..! “शिंदे सरकार कोसळले तर काय करायचे ?” फडणवीसांसह भाजपची गुप्त बैठक
दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणेंचा राज्याशी काहीही संबंध नाही. ईडी सीबीआय आपापल्या परीने काम करीत आहेत. त्यामुळे ज्यांना कर नाही त्याला डर कशाला ? रविंद्र वायकर यांच्यावर झालेली कारवाई कोणत्याही राजकीय सुडभावनेने करण्यात आलेली नाही. काहीतरी त्यांना माहिती लागली असेल तरच ही कारवाई झाली असेल असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच कोविड काळात या लोकांनी किती भ्रष्टाचार केला आहे. डेडबॉडी, खिचडी ऑक्सिजन प्लांट यामध्ये त्यांनी पैसे खाल्ले आहेत. मग त्यांना कपन चोर की खिचडी चोर म्हणायचे? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जोपर्यंत दिल्लीतील सरकार बदलत नाही तोपर्यंत..,” ईडी कारवायांवर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…“पुणे लोकसभेची जागा हातून निसटेल म्हणून..”, आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर जहरी टिका
हेही वाचा…निकालाच्या आधी ठाकरे गटाच्या आमदारावर ईडीची धाड, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा..“माझा नवरा वाघ होता अन मी त्याची वाघिण”, शरद मोहोळच्या पत्नीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हेही वाचा…शिंदे गटाचे मंत्री अन् खासदार एकमेकांत भिडले! लोण्याचा गोळा मटवण्यासाठी हे भांडखोर बोके…, विरोधकांची जहरी टिका