हिंगोली : सिल्लोडमध्ये गौतमी पाटील याच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना शिवीगाळ करण्यावरून वादग्रस्त ठरलेले कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार हे आणखी एका वादा अडकले आहेत.हिंगोलीचे पालकमंत्री सत्तार शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस ऑनलाईन उपस्थित होते. तेथे निधीचा हिशोब देण्यावरून खासदार हेमंत पाटील आणि अब्दूल सत्तार यांच्यात जोरदार खडांजगी झाली. पाटील यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करताच दोघांमध्ये अधिकाऱ्यांसमक्ष शिवीगाळ, धमक्या देण्यापर्यंत प्रकरण गेले. दरम्यान या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. यावरून आता काॅंग्रेसने जहरी टिका केली आहे.
हेही वाचा…२० जानेवारीला आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊ नका”, भाजपच्या खासदारांचं मोठं विधान, वाद पेटणार
अब्दुल सत्तार आणि हेमंत पाटील यांच्यातील संवाद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यावरून विरोधकांनी अब्दूल सत्तारांसह हेमंत पाटील आणि राज्य सरकारवर जोरदार टिका केली. यातच महायुती खोके सरकारचे लोकप्रतिनिधी म्हणजे लोण्याचा गोळा मटकवण्यासाठी टपून बसलेले भांडखोर बोके झाले आहेत. जनतेची कामं किंवा विकासासाठी न भांडता निधी वाटपाची मलई मिळवण्यासाठी हमरी तुमरी शिवीगाळ करणाऱ्या खोके सरकारच्या लोकप्रतिनिंधीचे दर्शन सध्या महाराष्ट्राला घडत आहे. अशी टिका काॅंग्रेसने केली आहे.
हेही वाचा…गुंड शरद मोहोळच्या कुटुंबियांची नितेश राणे भेट घेणार, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
दरम्यान, शिवसेना आमदार अपात्र याचिकांवरील निकाल उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लावणार आहेत. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या या प्रकरणावरील निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर सरकार देखील कोसळू शकते. परंतु त्याआधी ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.
महायुती खोके सरकारचे लोकप्रतिनिधी म्हणजे लोण्याचा गोळा मटकवण्यासाठी टपून बसलेले भांडखोर बोके झाले आहेत. जनतेची कामं किंवा विकासासाठी न भांडता निधी वाटपाची मलई मिळवण्यासाठी हमरी तुमरी – शिवीगाळ करणाऱ्या खोके सरकारच्या लोकप्रतिनिधिंचें दर्शन सध्या महाराष्ट्राला घडत आहे pic.twitter.com/E0sExTOD3i
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) January 9, 2024
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालाआधी ठाकरेंना मोठा धक्का, आमदार रविंद्र वायकरांच्या घरी इडीचा छापा
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र प्रकरण..! “शिंदे सरकार कोसळले तर काय करायचे ?” फडणवीसांसह भाजपची गुप्त बैठक
हेही वाचा…बीड जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार, ५४ पदाधिकारी शिंदे गटात दाखल
हेही वाचा..“पहिला भुंकप राहुल नार्वेकर राज्यात करतील,” शिवसेना अपात्र याचिका प्रकरणावर माजी मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक विधान
हेही वाचा…२० जानेवारीला आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊ नका”, भाजपच्या खासदारांचं मोठं विधान, वाद पेटणार