पुणे : पुण्याची जागा हातून निसटेल ही महाराष्ट्रातल्या बेकायदेशीर राजवटीला भिती आहे म्हणून गेल्या वर्षभरापासून पुण्याला लोकसभेत प्रतिनिधित्व नाही. परंतु भाजप पुरस्कृत खोके सरकार सार्वजनिक कामांची आणि नागरिकांच्या सेवेची काळजी करताना मात्र दिसत नाही. अशी टिका ठाकरे गटाचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. त्या जागेवर अद्यापही पोटनिवडणुक झाली नाही. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…बीड जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार, ५४ पदाधिकारी शिंदे गटात दाखल
पुण्याचं नवीन विमानतळ टर्मिनल गेल्या ४ महिन्यांहून अधिक काळ तयार आहे आणि उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. ३ महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या MTHL प्रमाणेच ८ महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेले दिघा रेल्वे स्थानक व उरण लाईन केवळ खोके सरकारच्या व्हीआयपींच्या तारखा न मिळाल्याने पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन थांबले असल्याचेही आदित्य ठाकरेंनी सांगितले.
हेही वाचा..“पहिला भुंकप राहुल नार्वेकर राज्यात करतील,” शिवसेना अपात्र याचिका प्रकरणावर माजी मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक विधान
केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून महाराष्ट्रवरच सातत्याने इतका अन्याय का होतोय.? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी यानिमित्ताने उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकार बदलल्यानंतर पुण्याचा प्रस्तावित नवीन विमानतळ रखडला आहे. पुणे जिल्ह्यात येणाऱ्या वेदांता फॉक्सकॉनला खोके सरकारे अचानक गुजरातला पाठवलं आणि आता पुण्याच्या विमानतळ टर्मिनलच्या उद्घाटनाला ४ महिने विलंब केला जात आहे. पुणे- मुंबईसारख्या शहरांबद्दल केंद्रातील सरकारच्या आणि राज्यातील राजवटीच्या मनात एवढा तिरस्कार असेल तर यांच्याकडून महाराष्ट्र न्यायाची अपेक्षा कशी करू शकेल? असा सवालही त्यांनी केलाय.
गेल्या वर्षभरापासून पुण्याला लोकसभेत प्रतिनिधित्व नाही… का तर पुण्याची जागा हातून निसटेल ही महाराष्ट्रातल्या बेकायदेशीर राजवटीला भीती आहे म्हणून!
पण, भाजप पुरस्कृत खोके सरकार सार्वजनिक कामांची आणि नागरिकांच्या सेवेची काळजी करताना मात्र दिसत नाही!
पुण्याचं नवीन विमानतळ…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 9, 2024
READ ALSO :
हेही वाचा…निकालाच्या आधी ठाकरे गटाच्या आमदारावर ईडीची धाड, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा..“माझा नवरा वाघ होता अन मी त्याची वाघिण”, शरद मोहोळच्या पत्नीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हेही वाचा…शिंदे गटाचे मंत्री अन् खासदार एकमेकांत भिडले! लोण्याचा गोळा मटवण्यासाठी हे भांडखोर बोके…, विरोधकांची जहरी टिका
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालाआधी ठाकरेंना मोठा धक्का, आमदार रविंद्र वायकरांच्या घरी इडीचा छापा
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र प्रकरण..! “शिंदे सरकार कोसळले तर काय करायचे ?” फडणवीसांसह भाजपची गुप्त बैठक