मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणासंदर्भात उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपला निकाल जाहीर करणार आहेत. गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या या प्रकरणाकडे आता सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष असून एकनाथ शिंदे अपात्र झाले तर सरकार देखील कोसळू शकते. परंतु निकाल लागण्याच्या आधीच ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची उलटसुलट चर्चा सुरू आहे. तर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार आरोप लावले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..“पहिला भुंकप राहुल नार्वेकर राज्यात करतील,” शिवसेना अपात्र याचिका प्रकरणावर माजी मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक विधान
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. त्याचा निकाल उद्या लागणार आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभा, लोकसभेत आम्हाला बहुमत आहे. यातच निवडणुक आयोगाने देखील निवडणुक चिन्ह आणि पक्षनाव आम्हाला दिलं आहे. त्यामुळे बहुमताला महत्व असून त्यानुसार निकाल देणे अपेक्षित आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की संख्याबळानुसार निकाल लागेल अशी अपेक्षा आहे. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा…२० जानेवारीला आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊ नका”, भाजपच्या खासदारांचं मोठं विधान, वाद पेटणार
दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणेंचा राज्याशी काहीही संबंध नाही. ईडी सीबीआय आपापल्या परीने काम करीत आहेत. त्यामुळे ज्यांना कर नाही त्याला डर कशाला ? रविंद्र वायकर यांच्यावर झालेली कारवाई कोणत्याही राजकीय सुडभावनेने करण्यात आलेली नाही. काहीतरी त्यांना माहिती लागली असेल तरच ही कारवाई झाली असेल असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच कोविड काळात या लोकांनी किती भ्रष्टाचार केला आहे. डेडबॉडी, खिचडी ऑक्सिजन प्लांट यामध्ये त्यांनी पैसे खाल्ले आहेत. मग त्यांना कपन चोर की खिचडी चोर म्हणायचे? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“माझा नवरा वाघ होता अन मी त्याची वाघिण”, शरद मोहोळच्या पत्नीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हेही वाचा…शिंदे गटाचे मंत्री अन् खासदार एकमेकांत भिडले! लोण्याचा गोळा मटवण्यासाठी हे भांडखोर बोके…, विरोधकांची जहरी टिका
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालाआधी ठाकरेंना मोठा धक्का, आमदार रविंद्र वायकरांच्या घरी इडीचा छापा
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र प्रकरण..! “शिंदे सरकार कोसळले तर काय करायचे ?” फडणवीसांसह भाजपची गुप्त बैठक
हेही वाचा…बीड जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार, ५४ पदाधिकारी शिंदे गटात दाखल