पुणे : कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळ याची भरदिवसा त्याच्याच साथीदारांनी गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर शरद मोहोळ याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे. यातच शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी न्याय मिळण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर भाजपचे नेते नितेश राणे यांनी देखील मोहोळ कुटुबियांची काल भेट घेतली. यावेळी स्वाती मोहोळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…२० जानेवारीला आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊ नका”, भाजपच्या खासदारांचं मोठं विधान, वाद पेटणार
माझा सरकार आणि प्रशासनावर विश्वास आहे. माझे पति हिंदुत्ववादाचं काम करत होते म्हणून ही घटना झाली आहे. ज्यांना वाटत आहे की त्यांचं असं करून मी खचून जाईल. त्यांना माझं एकच सांगणं आहे, मी हिंदुत्वावाद्याची बायको आहे. माझा नवरा वाघ होता अन मी त्याची वाघिण आहे. हिंदुत्ववादासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढत राहणार असं स्वाती मोहोळ यांनी सांगितले. स्वाती मोहोळ यांनी २०२२ साली चंद्रकांत पाटील, जगदीश मुळीक, आणि मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
हेही वाचा…२० जानेवारीला आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊ नका”, भाजपच्या खासदारांचं मोठं विधान, वाद पेटणार
दरम्यान, राजकीय चर्चा करायला आलो नाही. मोहोळ कुटुंबाने आपलं हिंदुत्ववादी काम सुरू ठेवायला हवं. ताईनी ताकदीने आपलं काम पुढे घेऊन जावं. हिंदू समाजावर संकट आलं की शरद मोहोळ उभे राहिले आहेत. मीडियामधील काहींनी त्यांची चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करू नये. त्याबद्दल मोहोळ कुटुंबियांची नाराजी आहे. ते गुन्हेगारी क्षेत्रात कसे आले आणि का आले कोणालाच माहिती नाही. त्यामुळे चुकीची प्रतिमा तयार करणं थांबवावं असे नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे गटाचे मंत्री अन् खासदार एकमेकांत भिडले! लोण्याचा गोळा मटवण्यासाठी हे भांडखोर बोके…, विरोधकांची जहरी टिका
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालाआधी ठाकरेंना मोठा धक्का, आमदार रविंद्र वायकरांच्या घरी इडीचा छापा
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र प्रकरण..! “शिंदे सरकार कोसळले तर काय करायचे ?” फडणवीसांसह भाजपची गुप्त बैठक
हेही वाचा…बीड जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार, ५४ पदाधिकारी शिंदे गटात दाखल
हेही वाचा..“पहिला भुंकप राहुल नार्वेकर राज्यात करतील,” शिवसेना अपात्र याचिका प्रकरणावर माजी मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक विधान