मुंबई : शिवसेना आमदार अपात्र याचिकेंवरील निकाल उद्या विधानसभा अध्यक्ष उद्या देणार आहेत. परंतु त्याआधीच ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. ईडीचे जवळपास ११ ते १५ अधिकारी रविंद्र वायकरांच्या घरी सकाळीच दाखल झाले. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याच घटनांच्या अनुषंगाने आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र प्रकरण..! “शिंदे सरकार कोसळले तर काय करायचे ?” फडणवीसांसह भाजपची गुप्त बैठक
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर उद्या निकाल लागणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. यावर बोलतांना शरद पवार म्हणाले की, आमदार अपात्र प्रकरण प्रलंबित असताना अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटले नसते तर पदाची प्रतिष्ठा राहिली असती. असं शरद पवारांनी म्हटले. तर जोपर्यंत दिल्लीतील सरकार बदलत नाही. तोपर्यंत विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाया होत राहतील असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…बीड जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार, ५४ पदाधिकारी शिंदे गटात दाखल
दरम्यान, अलिकडेच अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा पुन्हा उल्लेख केला होता. त्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं आहे. माझ्या वयाविषयी बोलणे त्यांना योग्य वाटत असेल तर बोलत असतील. मी इतके वर्ष निधी मंडळात, संसदेत काम केले. माझ्या कार्यक्षमताबाबत कोणी बोलले नाही. असा टोलाही शरद पवारांनी अजित पवारांना लगावला. तसेच लोकसभा जागावाटपाबाबत शरद पवारांनी मोठी प्रतिक्रिया दिली. आमची जागावाटपाबाबत चर्चा झाली आहे. जागा वाटपबाबत खूप काही मतभेद नाहीत. काही जागाबाबत चर्चा करावी लागेल. असेही शरद पवार म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“पुणे लोकसभेची जागा हातून निसटेल म्हणून..”, आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर जहरी टिका
हेही वाचा…निकालाच्या आधी ठाकरे गटाच्या आमदारावर ईडीची धाड, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा..“माझा नवरा वाघ होता अन मी त्याची वाघिण”, शरद मोहोळच्या पत्नीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हेही वाचा…शिंदे गटाचे मंत्री अन् खासदार एकमेकांत भिडले! लोण्याचा गोळा मटवण्यासाठी हे भांडखोर बोके…, विरोधकांची जहरी टिका
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालाआधी ठाकरेंना मोठा धक्का, आमदार रविंद्र वायकरांच्या घरी इडीचा छापा