मुंबई : शिवसेना अपात्र आमदारांच्या याचिकांवर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. त्यामुळे या निकालाकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्यानंतर किंवा पक्षाच्या घटनेचं उल्लंघन झाल्याचं सिद्ध झाल्यानंतर संबंधित आमदारांची विधिमंडळ सदस्यत्वता धोक्यात आली असून शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांवर धोक्याची घंटा समोर आली आहे. त्यामुळे या निकालात एकनाथ शिंदे यांच्या बाजूचे ४० तर ठाकरे गटातील १४ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
हेही वाचा…“माझा नवरा वाघ होता अन मी त्याची वाघिण”, शरद मोहोळच्या पत्नीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
शिवसेनेच्या पक्ष फुटीनंतर दोन्ही गटाने आमदार अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल केली. सुरूवातीला ठाकरे गटाने शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल केली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्यांचा देखील यात समावेश आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यामध्ये अपात्र ठरले तर राज्याचं सरकार देखील कोसळू शकते.
हेही वाचा…शिंदे गटाचे मंत्री अन् खासदार एकमेकांत भिडले! लोण्याचा गोळा मटवण्यासाठी हे भांडखोर बोके…, विरोधकांची जहरी टिका
त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील ठाकरे गटातील १४ आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल केली. या प्रकरणासंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एकूण ३४ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर १४ सप्टेंबर ते २० डिसेंबर यादरम्यान सुनावणी झाली. यानंतर शिंदे गटाकडून वकिल महेश जेठमलानी तर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. यातून जवळपास ५०० पानांचं निकालपत्र तयार करण्यात आलं असून उद्या काय निर्णय घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, निकालाच्या आधीच राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावरून आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली. तसेच यानिकालावर अपेक्षा आहे. परंतु अजून वेळकाढूपणा केला जाईल. असं ठाकरे यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जुलूमशहांचा नि:पात जनता करणारच !” निकालाआधी उद्धव ठाकरेंनी दिली मोठी गर्जना
हेही वाचा…निकालाच्या आधी ठाकरेंचे दोन शिलेदार अडचणीत..! वायकरांच्या नंतर ‘या’ नेत्याच्या घरावर आयकर विभागाची धाड
हेही वाचा…“जोपर्यंत दिल्लीतील सरकार बदलत नाही तोपर्यंत..,” ईडी कारवायांवर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…“पुणे लोकसभेची जागा हातून निसटेल म्हणून..”, आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर जहरी टिका
हेही वाचा…निकालाच्या आधी ठाकरे गटाच्या आमदारावर ईडीची धाड, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….