नाशिक : शिवसेना आमदार अपात्र याचिका प्रकरणावर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. परंतु त्याआधीच ठाकरे गटातील आमदार रविंद्र वायकर यांच्या घरी सकाळी इडीने धाड टाकली तर दुपारच्या आसपास खासदार राजन विचारे यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. निकालाच्या आधीच ठाकरेंच्या दोन्ही नेत्यांच्या घरी केंद्रीय यंत्रणा आल्याने राजकीय वर्तुळात याची एकच चर्चा सुरू झाली. यावरून आता राज्य सरकारवर जोरदार टिका केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“जोपर्यंत दिल्लीतील सरकार बदलत नाही तोपर्यंत..,” ईडी कारवायांवर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया
२२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. तर दुसऱ्या बाजूला २२ जानेवारीलाच उद्धव ठाकरे नाशिक येथील काळाराम मंदिरात महाआरती करणार आहेत. त्याच्या आधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काळाराम मंदिरात जाऊन आरती केली. त्यावरूनही सुषमा अंधारे यांनी जोरदार टिका केलीय. रविंद्र वायकरांच्या घरी आज पडलेली ईडीची धाड म्हणजे ते सन्माननीय पक्षप्रमुखांच्या सोबत अत्यंत निष्ठेने आणि ठामपणे उभे असल्याची पोचपावती आहे असे आम्ही मानतो. राजकीय सुडभावनेने होत असलेल्या या कारवाया महाराष्ट्राची जनता बघत आहे. एकाच वेळी रवींद्र वायकर , राजन विचारे या निष्ठावंत शिलेदारावर सूडबुद्धीने कारवाई आणि त्याच वेळेला बावनकुळे यांची नाशिक मध्ये धावाधाव म्हणजेच भाजपला आजही उद्धवसाहेब हेच सगळ्यात मोठे आव्हान वाटते. असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…“पुणे लोकसभेची जागा हातून निसटेल म्हणून..”, आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर जहरी टिका
पाण्यासारखा पैसा खर्च करत खोक्यांच्या बळावर अनेक पक्ष फोडून सुद्धा ईडी, सीबीआय आयकर विभाग सारख्या स्वायस्त यंत्रणांना हाताशी धरून सर्व प्रकारच्या राजकीय सुडाच्या कारवाई केल्यानंतर सुध्दा भाजपला अजूनही महाराष्ट्रात आव्हान देणारा पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भीती वाटते. या भीतीपोटीच साम दाम दंड भेद या नितीसह आता धार्मिक कर्मकांड ही नीती वापरत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरती केली. बावनकुळे यांची ही सगळी धावपळ पाहता उद्धवसाहेबांच्या शिवसेनेची दहशत भाजपच्या मनात किती घर करून बसलेली आहे हे स्पष्ट होते. पण मनात स्वार्थ आणि कपटबुद्धी ठेऊन केलेली आरती रामाला तरी मानवणारी असेल का ? असा खोचक सवाल देखील सुषमा अंधारे यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…चऱ्होलीतील प्रधानमंत्री आवासच्या लाभार्थ्यांचे ‘स्वप्न साकार’, आमदार महेश लांडगे यांचा बैठकीत जागेवर तोडगा
हेही वाचा…मोदींनी लोकसभेची निवडणूक नाशिकमधून लढवावी ; नाशिकच्या साधू महंतांचे नरेंद्र मोदींकडे साकडे
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरण..! एकनाथ शिंदेंचे ४० की ठाकरेंचे १४ आमदार ! कुणाचा गेम होणार ?
हेही वाचा…“जुलूमशहांचा नि:पात जनता करणारच !” निकालाआधी उद्धव ठाकरेंनी दिली मोठी गर्जना
हेही वाचा…निकालाच्या आधी ठाकरेंचे दोन शिलेदार अडचणीत..! वायकरांच्या नंतर ‘या’ नेत्याच्या घरावर आयकर विभागाची धाड