मुंबई : मुंबईत मनसेच्या दोन्ही गटात मोठा राडा बघायला मिळाला आहे. मराठी कामगार सेना संघटनेचा अध्यक्ष महेश जाधव समर्थक आणि मनसेच्या कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. माथाडी कामगार महेश जाधव यांच्या समर्थनार्थ मेरी कव्हर रूग्णालयात जमा झाले. त्यानंतर महेश जाधवांच्या समर्थकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना पळवून पळवून मारल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरण..! एकनाथ शिंदेंचे ४० की ठाकरेंचे १४ आमदार ! कुणाचा गेम होणार ?
मराठी कामगार सेना संघटेनेचे महेश जाधव यांच्यावर मनसेच्या काही नेत्यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर महेश जाधव यांना अमित ठाकरे यांनी बोलवले असता जाधवांनी खालच्या भाषेत टिका केली. त्यानंतर त्याला चोप देण्यात आला असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. त्यानंतर राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष खंडणीखोर असल्याचा आरोप महेश जाधव यांनी केला. यानंतर माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केली.
महेश जाधव यांना मारहाण झाल्यानंतर जाधव समर्थक आक्रमक झाले. त्यानंतर महेश जाधव यांच्या समर्थकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना पळवून पळवून मारले. यासंदर्भात एक व्हिडीओ देखील पोस्ट करण्यात आला. तर महेश जाधव यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला असून मरेपर्यंत माथाडी कामगारांच्या प्रश्नासाठी लढत राहणार असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…“जुलूमशहांचा नि:पात जनता करणारच !” निकालाआधी उद्धव ठाकरेंनी दिली मोठी गर्जना
यातच मनसेकडून महेश जाधव यांची हकालपट्टी करण्यात आली. यासंदर्भात मनसेने अधिकृत पत्रक काढले. यामध्ये सर्व महाराष्ट्र सैनिकांना कळविण्यात येत आहे की, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी कामगार सेना या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. मराठी कामगार सेना या संघटनेचा, त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कोणताही संबंध नसेल. त्यामुळे मराठी कामगार सेनेच्या कोणत्याही भूमिकांशी, मराठी कामगार सेनेच्या पदाधिकारी-सदस्यांशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाचा, पक्षाच्या इतर अंगीकृत संघटनांचा कोणताही संबंध नसेल याची सर्व महाराष्ट्र सैनिकांनी नोंद घ्यावी, असे सांगण्यात आलं.
READ ALSO :
हेही वाचा…नगर दक्षिण लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा, विखे पाटलांनी एका वाक्यात संपवून टाकला
हेही वाचा…“तर ४० गद्दार बाद होऊन अपात्र होतील”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“उद्धवसाहेबांच्या शिवसेनेची दहशत भाजपच्या मनात”, ईडी आयटीच्या कारवायांवरून ठाकरे गटाची मोठी टिका
हेही वाचा…चऱ्होलीतील प्रधानमंत्री आवासच्या लाभार्थ्यांचे ‘स्वप्न साकार’, आमदार महेश लांडगे यांचा बैठकीत जागेवर तोडगा
हेही वाचा…मोदींनी लोकसभेची निवडणूक नाशिकमधून लढवावी ; नाशिकच्या साधू महंतांचे नरेंद्र मोदींकडे साकडे