पुणे : कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळ याची भरदिवसा त्याच्याच साथीदारांनी गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर शरद मोहोळ याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे. यातच शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी न्याय मिळण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर भाजपचे नेते नितेश राणे यांनी देखील मोहोळ कुटुबियांची काल भेट घेतली. यानंतर आता या प्रकरणासंदर्भात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा…“उद्धवसाहेबांच्या शिवसेनेची दहशत भाजपच्या मनात”, ईडी आयटीच्या कारवायांवरून ठाकरे गटाची मोठी टिका
शरद मोहोळ हत्या प्रकरणातील तपास आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. गॅगस्टर शरद मोहोळच्या खुनाचा पुढील तपास आता गुन्हे शाखा करणार आहेत. गुन्हे शाखेच्या सहाय्यक आयुक्तांकडून आता तपास होणार आहे. याप्रकरणासंदर्भात आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन वकिलांचा देखील समावेश आहे.
माझा सरकार आणि प्रशासनावर विश्वास आहे. माझे पति हिंदुत्ववादाचं काम करत होते म्हणून ही घटना झाली आहे. ज्यांना वाटत आहे की त्यांचं असं करून मी खचून जाईल. त्यांना माझं एकच सांगणं आहे, मी हिंदुत्वावाद्याची बायको आहे. माझा नवरा वाघ होता अन मी त्याची वाघिण आहे. हिंदुत्ववादासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढत राहणार असं स्वाती मोहोळ यांनी सांगितले. स्वाती मोहोळ यांनी २०२२ साली चंद्रकांत पाटील, जगदीश मुळीक, आणि मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
हेही वाचा…चऱ्होलीतील प्रधानमंत्री आवासच्या लाभार्थ्यांचे ‘स्वप्न साकार’, आमदार महेश लांडगे यांचा बैठकीत जागेवर तोडगा
दरम्यान, राजकीय चर्चा करायला आलो नाही. मोहोळ कुटुंबाने आपलं हिंदुत्ववादी काम सुरू ठेवायला हवं. ताईनी ताकदीने आपलं काम पुढे घेऊन जावं. हिंदू समाजावर संकट आलं की शरद मोहोळ उभे राहिले आहेत. मीडियामधील काहींनी त्यांची चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करू नये. त्याबद्दल मोहोळ कुटुंबियांची नाराजी आहे. ते गुन्हेगारी क्षेत्रात कसे आले आणि का आले कोणालाच माहिती नाही. त्यामुळे चुकीची प्रतिमा तयार करणं थांबवावं असे नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…निकालाच्या आधी नार्वेकरांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, राहुल नार्वेकरांनी दिलं भेटीचं कारण, म्हणाले…
हेही वाचा…“काॅंग्रेसचे नेते सुनील केदारांना कोर्टाचा मोठा दिलासा ; ” ‘या’ प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन मंजूर
हेही वाचा…मनसेच्या दोन्ही गटात मोठा राडा, मनसेच्या कार्यकर्त्यांना पळवून पळवून हाणलं
हेही वाचा…नगर दक्षिण लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा, विखे पाटलांनी एका वाक्यात संपवून टाकला
हेही वाचा…“तर ४० गद्दार बाद होऊन अपात्र होतील”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर जोरदार घणाघात