नागपूर : काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. नागपूर जिल्हा बॅक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सुनील केदारांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी पार पडली. या सुनावणीत सुनील केदार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यावरून आता विरोधी पक्षाकडून त्याचं स्वागत करण्यात आलं आहे.
हेही वाचा…नगर दक्षिण लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा, विखे पाटलांनी एका वाक्यात संपवून टाकला
धसका त्यांचाच घेतला जातो, ज्यांचा दरारा असतो. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मित्र सुनील केदार हे लढवय्ये आहेत. उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला दिलेली स्थगिती आणि जामीन मंजूर करणं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आता फक्त ज्या तत्परतेने त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली होती. तीच तत्परता सरकारने आमदारकी पुन्हा बहाल करायला दाखवावी, असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“तर ४० गद्दार बाद होऊन अपात्र होतील”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर जोरदार घणाघात
काँग्रेस पक्षाचे लढवय्ये नेते आणि माझे मित्र सुनीलभाऊ केदार यांना राजकीय दृष्ट्या त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय द्वेषाने प्रेरित आहे. सुनीलभाऊ केदार यांना जामीन मिळू नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करून सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीला आळा घातला. दडपशाहीला न जुमानता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सुरू असलेल्या सुनीलभाऊ यांच्या लढाईत आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत आहे. असे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, १५० कोटींच्या नागपूर जिल्हा बॅंक घोटाळ्या प्रकरणी सुनील केदार यांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांना १२ लाख ५० हजारांचा दंड आणि ५ वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षाविरोधात सुनील केदारांनी उच्च न्यायालयात धाव घेत जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यातच आता कोर्टाने एक लाखाच्या जातमुचलक्यावर सुनील केदार यांना कोर्टाने जामीन मंजूर केला असून प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये २० जण इच्छुक ; आजी माजी आमदार, नगरसेवकांचा समावेश
हेही वाचा…शरद मोहोळ ह’त्या प्रकरणात मोठी बातमी समोर, मोहोळ ह’त्या प्रकरणात आता गुन्हे शाखेची एंन्ट्री
हेही वाचा…निकालाच्या आधी नार्वेकरांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, राहुल नार्वेकरांनी दिलं भेटीचं कारण, म्हणाले…
हेही वाचा…“काॅंग्रेसचे नेते सुनील केदारांना कोर्टाचा मोठा दिलासा ; ” ‘या’ प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन मंजूर
हेही वाचा…मनसेच्या दोन्ही गटात मोठा राडा, मनसेच्या कार्यकर्त्यांना पळवून पळवून हाणलं