परभणी : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राज्य सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरुनच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनीही ओबीसी आरक्षणावरुन आमच्या पक्षाचे ३०-३५ आमदार झाले तर मराठ्यांना आणि मुस्लिमांनाही आरक्षण देऊ शकतो असे वक्तव्य केले आहे. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना महादेव जानकर यांनी हे वक्तव्य केले आहे.
टीईटी पेपरफुटी प्रकरण: आयुक्त तुकाराम सुपेंच्या घरी 2 कोटी रुपये कॅश आणि सोनं सापडलं
यावेळी त्यांनी मराठा, ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकारवर टीका केली. तसेच त्यांच्या पक्षाचे ३० ते ३५ आमदार म्हणून निवडून देण्याचं आवाहन करताना मराठा, मुसलमान, ओबीसी सगळ्यांना आरक्षण देतो असं आश्वासन महादेव जानकर यांनी दिले.
पाठीत खंजीर खुपसला तर तो उलटा फिरवायला वेळ लागणार नाही; राजू शेट्टींचा सतेज पाटलांना इशारा
“सामान्य लोकांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे. आमचे ३०-३५ आमदार होऊ द्या. दहा मिनिटांत ओबीसींची गंमत करुन टाकतो. मराठ्यांना पण आरक्षण देऊ शकतो आणि मुस्लिमांनाही आरक्षण देतो. मुसलमानावर तर किती अन्याय आहे. गॅरेज बघितलं का मुसलमान, आंब्याचं दुकान बघितलं का मुसलमान, कोंबडीचं दुकान बघितलं की मुसलमान, त्याचा कुठं कलेक्टर नाय, काय नाय, बोंबा बोंब, टोपी घालून केळं विकतंय, फळं विकतंय अन् त्या मुसलमानाला लोक शिवा देतेत, हिंदू बी भिकारी अन् मुसलमान बी भिकारी, अन राज्य चालवणारा तिसराच मालक असतो ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे,” असं महादेव जानकर यावेळी म्हणाले.
राज्याच हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; उद्यापासून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने भिडणार
यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजही ओबीसी होते असेही म्हटले आहे. “मराठा समाजाला माझा विनंती आहे. शाहू महाराजांनी या पहिलं देशात आरक्षण दिलं. मराठ्यांना आरक्षण होतं, पण नंतर आरक्षण का गेलं? शिवाजी राजादेखील ओबीसी होता. कुळवाडी भूषण राजा होता. आमच्यातल्या तथाकथित लोकांना वाटलं, आम्ही लय मोठं हाय गावचं, आम्हाला नको तसलं आरक्षण आणि आज अवस्था काय झाली आहे?”असे महादेव जानकर म्हणाले.
Read also:
- आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा, पण आम्ही…; संयज राऊतांचा केंद्र सरकारला इशारा
- “संजय राऊतांनी शिवसेनेतील बाकीच्यांना जवळजवळ नामशेष केले”; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका
- सदावर्ते हे आमचे वकील आहेत, भूमिका पटली नाही तर वकील बदलून टाकू – अजय गुजर
- महादेव जानकारांचा नवा शोध; म्हणाले, शिवाजी महाराजही ओबीसी होते
- मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध