पणजी : गोव्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. राज्यासह देशभरात सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने निवडणूक आयोगाने जी नियमावली आखून दिली आहे त्याचे सर्वांनी पालन करणे बंधनकारक केले आहे. मात्र कॉंग्रेस नेते मायकल लोबो यांनी या नियमावलीचा भंग केल्याचे चित्र आज दिसून आले.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप; तक्रार दाखल
आज कॉंग्रेसचे कलंगुटचे उमेदवार मायकल लोबो आणि त्यांच्या पत्नी डीलायला लोबो यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निवडणूक आयोगाने निर्देश दिले असताना देखील लोबो यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी चांगलीच गर्दी केली.
काँग्रेस भवनावरून इंदापूरात हायहोल्टेज राडा; हर्षवर्धन पाटील विरुद्ध संजय जगताप संघर्ष पेटणार
या घटनेचा एक व्हिडीओ आणि फोटोज सध्या व्हायरल झाले असून नेत्यांसह अनेकांनी मास्क घातले नसल्याचे दिसत आहे. सोबतच शारीरिक अंतर देखील पाळले गेले नसल्याचे दिसत आहे. यामुळे आता सर्वसामान्य जनतेला कोरोना कोरोनाचे नियम पालन करण्यासाठी आग्रह केला जातो मग नेत्यांना यातून सूट देण्यात आली आहे का असा सवाल आता सर्व सामान्य नागरिक करू लागले आहेत.
न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कणकवली पोलिसांत येरझारा; नितेश राणे म्हणतात…
गोव्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असून आरोग्य विभाग तसेच निवडणूक आयोगाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना देखील या काळात कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असताना दुसऱ्या बाजूला नेते मात्र कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करताना दिसून येत आहेत.केवळ लोबो दाम्पत्यच नव्हे टर अनेक नेते देखील कोरोना नियमांना हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आता निवडणूक आयोग या नेत्यांवर नेमकी काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read also:
- काँग्रेसला मोठं खिंडार; मालेगावच्या महापौरांसह 27 नगरसेवकांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घेणार का? टिपू सुलतान प्रकरणावरून संजय राऊतांचा सवाल
- गोवा निवडणूक २०२२: जोशुआ डिसुझा यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल
- अजित पवारांचा मुलगा जय पवार याचे कारनामे उघड करणार, तो तुरुंगात जाणार – किरीट सोमय्या
- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला नक्षलवाद्यांचा पाठींबा; गोंदियात झळकले बॅनर-पत्रकं