मुंबई : निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरणावरून भाजपाने शिवसेनेला घेरले असतानाच, ठाकरे सरकारनेही भाजपाला अडचणीत आणले आहे. खासदार उन्मेष पाटील यांनी चार वर्षांपूर्वी माजी सैनिक सोनू महाजन यांना मारहाण केली होती. याप्रकरणी आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिला आहेत. यामुळे भाजपाची कोंडी होण्याची शक्यता आहे.
अनिल देशमुख यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, २०१६ साली भाजपचे तेव्हाचे आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता.तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. यासंदर्भात मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना पाटील यांची यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
याच बरोबर, २०१६ साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई पाटील यांच्यावर झाली नाही, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.”
२०१६ साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई पाटील यांच्यावर झाली नाही.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 15, 2020