महाराष्ट्र विधीमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकलेखा समिती ही महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त समिती आहे. यामध्ये राज्याचे विनियोजन लेखे आणि नियंत्रक तसंच महालेखापरीक्षक यांचा अहवाल, त्याचं परिनिरीक्षण करणं, राज्य शासनाच्या वित्तीय लेख्यांचं आणि त्यावरील लेखापरीक्षा अहवालाचं परिनिरीक्षण करणं अशी कामं येतात.
सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत या लोकलेखा समितीच्या सदस्यपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा माजी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री विनय कोरे, माजी राज्यमंत्री संजय सावकारे आदींचा समावेश असणार आहे.
यामुळे आता मुनगंटीवार यांच्यावर अनेक नव्या जबाबदाऱ्या असणार आहेत. या नव्या पदासाठी सर्व स्तरातून मुनगंटीवार यांचं अभिनंदन केलं जात आहे.
Read Also :
‘त्याच दिवशी मी शपथ घेतलेली, अर्णबला सोडणार नाही’
रोहित पवारांच्या यशासाठी ‘मातोश्रीं’नी कसली कंबर; ‘सुनंदा पवार’ उतरल्या मैदानात