अहमदनगर – राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांच्या कर्जत – जामखेड मतदासरसंघाने स्वछता सर्वेक्षण स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या मतदारसंघाचा पहिला क्रमांक यावा यासाठी खुद्ध मातोश्री सुनंदा पवार आता रस्त्यावर उतरल्या आहेत. रोहित पवार यांच्यासाठी त्यांच्या मातोश्रींनी कंबर कसली आहे.
जामखेड आणि कर्जत शहराने केंद्र सरकारच्या स्वच्छता परीक्षणाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्वच्छता अभियानात दोन्ही शहरं तयारीला लागली आहेत. मी यात प्रबोधनाचे काम करत असल्याचं सुनंदा पवार यांनी सांगितलं आहे.
गेल्या वर्षीचे प्रगतिपुस्तक हे फारसं समा धानकारक नाही. त्यावर लाल रिमार्क खूप आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षेला बसून ते रिमार्क क्लिअर करणे याचं मोठं आव्हान आमच्यासमोर असल्याचं रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी सांगितलं सांगितलं
खरं तर लोकांची मानसिकता बदलणे हे मोठे आव्हान असून त्यावर आम्ही काम करत आहोत. तर हे शहर प्रदूषणमुक्त होऊन सुंदर होईल, असा विश्वास सुनंदा पवार यांनी व्यक्त केला. तसेच आतापर्यंत शंभरहून अधिक बैठका आणि कॉर्नर सभा झाल्या आहेत. ज्या काही समस्या आहेत त्या रोहित यांच्या माध्यमातून दूर होतील, असा विश्वास सुनंदा पवारांनी व्यक्त केला.
आपला मुलगा कुठल्याही क्षेत्रात असला तरी त्याला आईची साथ असतेच. असंच उदाहरण पवार कुटुंबियातून समोर आलं आहे. अहमदनगरमधील कर्जत शहर स्वच्छ सर्वेक्षण या अभियानात उतरलं आहे. यात चक्क आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी सहभाग नोंदवला आहे.