भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी शनिवारी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत . त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोविड चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे.
‘कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता चाचणी केल्यानंतर माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी व सर्वांनी आपापली काळजी घ्यावी ही विनंती, आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वाद सोबत आहेत, काळजीचे कारण नाही,’; अशी फेसबुक पोस्ट आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान, कोरोनाचा शिरकाव राज्यात आणि देशात दिवसोंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारडून काळजी घेण्याचा आवाहन करण्यात येत आहे.