पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली मशिदीवरील भोंग्याबाबतची भुमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं चिघळलं आहे. 4 मे पर्यंत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत अल्टिमेटम दिला होता. यानंतर राज्यात मनसेकडून आंदोलन करण्यात आले. मात्र या सर्व प्रकरणात पुण्यातील माजी शहराध्यक्ष वसंत मोरे चर्चेत आले होते. गेल्या काही दिवसांपासून ते अनरिचेबल होते. यावर आता त्यांनी मौन सोडले आहे.
राज्यात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने त्यांची सध्या पोलिसांकडून धरपकड केली जात आहे. दादर येथे मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. अशातच वसंत मोरे तिरूपणी बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. प्रभागातील मुस्लिम समाजातील लोकांशी बोलल्याने त्यांनी नमाज भोंग्याविना नमाज अदा केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी याबाबत एक फेसबुक पोस्ट केली आहे, त्यात असं म्हटलं आहे की, पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. परंतु मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय. साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली आणि आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करू असे सांगितले.
राज ठाकरे म्हणजे सेक्युलर जननायक; हिंदु महासंघाची टीका
दरम्यान, गुढीपाडवा आणि ठाण्यातील सभेनंतर राज ठाकरेंनी घेतलेल्या भुमिकेला वसंत मोरे यांनी केराची टोपली दाखवली होती. त्यानंतर त्यांना शहराध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची मनसे पुणे शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मात्र मनसेच्या सगळ्या घटनांमध्ये वसंत मोरे यांचा समावेश नसल्याने त्यांनी पक्ष सोडला असल्याच्या चर्चा रंगल्या. माय त्याबाबत वसंत मोरे यांनी अजून भाष्य केले नाही.
Read also:
- तुरुंगातुन सुटका होताच, नवनीत राणा रूग्णालयात दाखल; अनेक व्याधींनी त्रस्त
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार ॲक्शन मोडवर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- “राज ठाकरे उत्तम व्यंगचित्रकार, पण भाजपने हात कलम केले, भोंगावादाचा हिंदूंवर बूमरँग होणार”
- एनडीएच्या विस्तारासाठी भाजपाची नवी योजना; शिवसेनाची जागा मनसे घेणार?
- आघाडीला धक्का देत कॉंग्रेस वंचितसोबत जाण्याची शक्यता; महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार
- कुणाला अल्टिमेटम द्यायाचा, तो घरच्यांना द्या! ही काही हुकूमशाही नाही; अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं