मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला. येत्या दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे सर्वच पक्ष आता निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी कामाला लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयांनंतर आता महाविकासाआघाडीमध्ये देखील निवडणुकांही धामधुम सुरु झाली आहे. यासाठी आता खुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.
“उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीमध्ये एक साम्य…”; फडणवीसांनी केला खुलासा..
बुधवारी सर्वोच्च न्यायालयांच्या आदेशानंतर मुंबई येथील वाय बी चव्हाण प्रतिष्ठान सेंटर येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक पार पडली. यावेळी पक्षाचे आमदार, खासदार आणि मंत्री उपस्थित होते. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली असून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूका लढवाव्या, असा आदेश पवार यांनी दिला, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाली. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीत असलेल्या तिन्ही पक्ष शिवसेना, कॅाग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मिळून ही निवडणुक लढवावी, असा आदेश शरद पवार यांनी या बैठकीत दिला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे बघावे लागणार असल्याचे आव्हाड म्हणाले.
‘पुन्हा एकदा राजकारणासाठी भाजपने राज ठाकरे यांचा बळी दिला’
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी चर्चा केली. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुकांबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. आगामी निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लढविण्याबाबत आणि खासदार, मंत्री, आमदार यांना स्थानिक पातळीवर निवडणुकांसाठी एकत्र कसे येईल, यावर चर्चा झाली आहे. ओबीसी आरक्षण मिळावे ही महाविकास आघाडीची भूमिका होती. असे सांगतानाच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच निर्णय घेतील, असे पाटलांनी स्पष्ट केले.
Read also:
- “राज ठाकरे उत्तम व्यंगचित्रकार, पण भाजपने हात कलम केले, भोंगावादाचा हिंदूंवर बूमरँग होणार”
- एनडीएच्या विस्तारासाठी भाजपाची नवी योजना; शिवसेनाची जागा मनसे घेणार?
- आघाडीला धक्का देत कॉंग्रेस वंचितसोबत जाण्याची शक्यता; महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार
- कुणाला अल्टिमेटम द्यायाचा, तो घरच्यांना द्या! ही काही हुकूमशाही नाही; अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं
- शिर्डीत मुस्लिम समाजाचा नवा आदर्श; रोहित पवार म्हणाले, इथल्या जनतेच्या रक्तात ती भिनलीय
- राऊतांची तोफ आज पुण्यात धडाडणार; भोंगा, हनुमान चालिसा, हिंदुत्व, नेमकं काय बोलणार?