नागपूर – 1 मे राजी झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला होता. ‘राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगलं गातात असं मला आदित्यने सांगितलं होतं. आजपर्यंत एकाच व्यक्तीवा गाता येतं, असं मला वाटत होतं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला.
“..या राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार!”; संजय राऊतांचा व्हिडीओ मनसेने केला व्हायरल
आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याला उत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नी अमृता यांच्यामध्ये एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टींना उत्तर देणं सोडत नाही. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी देखील आपली पातळी वर ठेवली पाहिजे. अशाप्रकारचे काही आल्यानंतर माझं मत आहे की माझा पत्नीने उत्तर देण्याचं कारण नाही. अशा गोष्टी इग्नोर केल्या पाहिजेत. अर्थात हा त्या दोघांचा प्रश्न आहे. त्यामुळे मी यापेक्षा जास्त बोलणार नाही”
मग राज ठाकरे चैत्यभूमीवर आजवर का नाही गेले? जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना प्रतिसवाल
मुख्यमंत्र्यांच्या टीकेला अमृता फडणवीस यांनीही ट्वीट करत उत्तर दिलं होतं, मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अब्जाधीश फक्तं आपणच आहात. आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे. छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात, असं म्हटलं अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टॅग देखील केलं.
Read also:
- “पिंपरी-चिंचवड भाजपाचा निर्धार ‘अब की बार १०० पार’!”; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आमदार लांडगेंची पहिली प्रतिक्रिया
- “अजान दिली तर हनुमान चालिसा लावली जाणारच”; राज ठाकरे अजूनही निर्णयावर ठाम
- ‘खरी समस्या भोंगे नाही, त्यांना संपवण्याची हीच वेळ’; नितेश राणेंची दुसरी मागणी
- राज्यभरातून मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; संदीप देशपांडे, संतोष धुरी यांची पोलिसांच्या हातावर तुरी
- नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मंजूर; १२ दिवसांनी कोठडीतून होणार सुटका..