मुंबई – राज्यात २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीची स्थापन केली. मुख्यमंत्री शिवसेनेचे उद्धव ठाकरे असले तरी सरकार शरद पवार चालवतात अशी टिंगलवजा टीका होत असते. याला बळ देणारा व्हिडीओ मनसेचे आमदार राजू पाटील व अमेय खोपकर यांनी व्हायरल केला आहे; ज्यात शिवसेनेचे संजय राऊत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांचा उल्लेख करत आहेत! हा व्हिडीओ ३ मे रोजीचा आहे. राजू पाटील यांनी व्हिडीओला ‘सत्य वाचा…’ असे कॅप्शन दिले आहे व खरे सुपारीबाज संजय राऊत… हेच, असा टोमणा मारला.
भाजपाला मोठा धक्का; “संभाजीराजेंचं काँग्रेसमध्ये स्वागत”; सतेज पाटलांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
व्हिडीओत संजय राऊत हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याऐवजी शरद पवार याचे नाव घेत आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, या राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार… असे संजय राऊत म्हणतात! हा व्हिडीओ ३ मे २०२२ रोजीचा असल्याचे तेथील तारखेवरून लक्षात येते.
राज ठाकरेंना भाजपचा पाठिंबा; पक्षाने आदेश दिला तर भोंगे उतरवू
या संदर्भात उल्लेखनीय आहे की, शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या पुढाकाराने राज्यात महाविकास आघाडीची स्थापन होऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार अस्तित्वात आले. यातून शिवसेनेचे नुकसान होत असल्याची चर्चा आहे. यासाठी अनेकदा संजय राऊतांवर टीकाही होते. संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत; मात्र, काम राष्ट्रवादीसाठी करतात, अशी टीका मनसे वारंवार करते
सत्य वाचा …..#खरे_सुपारीबाज #संजय_उगाच pic.twitter.com/iGnuKKAq6G
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) May 3, 2022
Read also:
- राज, राणे आणि राणा म्हणजे RRR चित्रपट; छगन भुजबळ यांची राजकीय घडामोडींवर खोचक प्रतिक्रिया
- “राऊतांचा जीव केवढा आणि ते बोलतात किती”; दरेकरांचा संजय राऊतांना टोला
- “मनसेला मिळणारा प्रतिसाद पाहून गुन्हा दाखल, सुडापोटी सरकारकडून कारवाई”; दरेकरांची प्रतिक्रिया
- शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची प्रकृती स्थिर; भाजपा आमदार महेश लांडगे यांनी घेतली भेट
- मोठी बातमी! राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, अटक होणार?
- शिवतीर्थवर राजकीय हालचालींना वेग; राज ठाकरे यांच्याकडून मोठ्या निर्णयाची शक्यता