मुंबई – भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर निशाणा साधला. राऊतांचा दर्जा किती घसरला आहे. हे ते स्वतःचं वारंवार दाखवून देत असल्याची टीका दरेकर यांनी केली आहे. दरेकर म्हणाले, संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरेंचं काम विसरले आहेत. अल्टिमेटम हा बाळासाहेब ठाकरेंकडून दिला जात होता. मात्र आता संजय राऊत नुसतेच बोलतात. संजय राऊत कोण आहेत. त्यांचा जीव किती ते बोलतात किती असा टोला देवगळ यावेळी परवाईन दरेकर यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
“अशांतता माजवणाऱ्यांना जनता थारा देणार नाही”; रोहित पाटलांनी राज ठाकरेंना सुनावलं
यावेळी बोलताना प्रवीण दरकार यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत करत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. ते म्हणाले,”राज ठाकरेंच्या भूमिकेचे मी स्वागत करतो. राज ठाकरे सर्वच गोष्टी शांततेने करत आहेत. राज ठाकरे यांनी आज एक पाऊल मागे घेतले आहे. याचा अर्थ त्यांनी माघार घेतली असा होत नाही. त्यांनी चार पाऊल पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे घेतले आहे. आज सामनामधून राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. या टीकेला देखील दरेकरांनी अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिले आहे.
पवारांचे योगदान नाकारता येणार नाही, मात्र राज्याच्या सातबारा काय एकट्या शरद पवारांच्या नावावर आहे काय? बाकी कोणीच नाहीये का? मग शरद पवार यांचा अपमान म्हणजे संपूर्ण राज्याचा अपमान कसा होऊ शकतो असा सवाल देखील दरेकरांनी उपस्थित केला आहे. आधी महाविकासआघाडी नेत्यांनी या भ्रमातून बाहेर पडावे असे दरेकरांनी म्हटले आहे. दरम्यान रवी राणा याना घरासंबंधात पाठवण्यात आलेली नोटीस ही सूड भावनेतून पाठवण्यात आल्याचे देखील यावेळी दरेकरांनी म्हटले आहे.
Read also:
- “मनसेला मिळणारा प्रतिसाद पाहून गुन्हा दाखल, सुडापोटी सरकारकडून कारवाई”; दरेकरांची प्रतिक्रिया
- शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची प्रकृती स्थिर; भाजपा आमदार महेश लांडगे यांनी घेतली भेट
- मोठी बातमी! राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, अटक होणार?
- शिवतीर्थवर राजकीय हालचालींना वेग; राज ठाकरे यांच्याकडून मोठ्या निर्णयाची शक्यता
- राज ठाकरेंना भाजपचा पाठिंबा; पक्षाने आदेश दिला तर भोंगे उतरवू
- भाजपाला मोठा धक्का; “संभाजीराजेंचं काँग्रेसमध्ये स्वागत”; सतेज पाटलांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण