मुंबई – राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 मे रोजीच्या सभेत प्रक्षोभक वक्तव्य केल्या प्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर मनसेच्या आणि भाजपच्या नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही कारवाई सुडबुद्धीने सुरू आहे असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंना प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून सरकार घाबरले, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होऊ शकतो, तर कुणावरही होऊ शकतो. राज्य सरकारने सुड भावनेतून ही कारवाई केली आहे. राज्य सरकारकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करत त्यांना शांत करण्याचा केवीलपणा प्रयत्न सध्या सुरू आहे. ठाकरे सरकारला शांतता नकोय, हिटलर शाही मार्गाने ते शांतता ठेवू पाहताय, मात्र असे होऊ शकणार नाही. असे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
“राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर त्यांचा सूर” अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं
दरम्यान,औरंगाबादमध्ये 1 मे रोजी राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. या सभेला काही अटी शर्थी लावण्यात आल्या होत्या. तब्बल 16 अटी लावण्यात आल्या होत्या. यातल्या काही अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी देखील राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा झाल्याची माहिती आहे.
मनसे उद्याच्या आंदोलनावर ठाम आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषेत पत्रक काढून मनसे आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देशभरातील हिंदू बांधव आणि महाराष्ट्रातील मनसे कार्यकर्ते यांना संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे.
“अशांतता माजवणाऱ्यांना जनता थारा देणार नाही”; रोहित पाटलांनी राज ठाकरेंना सुनावलं
दुसरीकडे उद्याचं आंदोलन लक्षात घेता गृहविभाग अॅक्शन मोडमध्ये आला असून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत. मनसे नेते बाळा नांदगावर, संदीप देशपांडे नितीन सरदेसाई यांच्यासह राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. औरंगाबादमध्ये मनसेच्या 3 शहराध्यक्षांसह 40 जणांना कलम 149 अन्वये गुन्हा प्रतिबंधक नोटीस पाठवण्यात आली आहे.
Read also:
- शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची प्रकृती स्थिर; भाजपा आमदार महेश लांडगे यांनी घेतली भेट
- मोठी बातमी! राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, अटक होणार?
- शिवतीर्थवर राजकीय हालचालींना वेग; राज ठाकरे यांच्याकडून मोठ्या निर्णयाची शक्यता
- राज ठाकरेंना भाजपचा पाठिंबा; पक्षाने आदेश दिला तर भोंगे उतरवू
- भाजपाला मोठा धक्का; “संभाजीराजेंचं काँग्रेसमध्ये स्वागत”; सतेज पाटलांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
- ‘भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंड बंद करा’, अबू आझमींचं राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र