औरंगाबाद – राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादच्या सीटी चौक पोलीस स्थानकात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“संजय राऊतांचा बाबरी मशिदीशी काय संबंध”; राऊतांच्या टीकेला आशिष शेलारांचं उत्तर
औरंगाबादमध्ये 1 मे रोजी राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. या सभेला काही अटी शर्थी लावण्यात आल्या होत्या. तब्बल 16 अटी लावण्यात आल्या होत्या. यातल्या काही अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी देखील राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, मनसे उद्याच्या आंदोलनावर ठाम आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषेत पत्रक काढून मनसे आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देशभरातील हिंदू बांधव आणि महाराष्ट्रातील मनसे कार्यकर्ते यांना संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे.
राजकारण तापलं! “ओळख ना पाळख..भटमान्य टिळक म्हणत संभाजी ब्रिगेडची राज ठाकरेंवर टिका
दुसरीकडे उद्याचं आंदोलन लक्षात घेता गृहविभाग अॅक्शन मोडमध्ये आला असून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत. मनसे नेते बाळा नांदगावर, संदीप देशपांडे नितीन सरदेसाई यांच्यासह राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. औरंगाबादमध्ये मनसेच्या 3 शहराध्यक्षांसह 40 जणांना कलम 149 अन्वये गुन्हा प्रतिबंधक नोटीस पाठवण्यात आली आहे
Read also:
- शिवतीर्थवर राजकीय हालचालींना वेग; राज ठाकरे यांच्याकडून मोठ्या निर्णयाची शक्यता
- राज ठाकरेंना भाजपचा पाठिंबा; पक्षाने आदेश दिला तर भोंगे उतरवू
- भाजपाला मोठा धक्का; “संभाजीराजेंचं काँग्रेसमध्ये स्वागत”; सतेज पाटलांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
- ‘भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंड बंद करा’, अबू आझमींचं राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र
- फडणवीसांना अक्कल दाड, राणे संपलेलं दुकान, तर ओवेसी देश विघातक; विनायक राऊतांची जोरदार फटकेबाजी
- “अशांतता माजवणाऱ्यांना जनता थारा देणार नाही”; रोहित पाटलांनी राज ठाकरेंना सुनावलं