कोल्हापूर – खासदार छत्रपती संभाजीराजे हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. संभाजीराजे यांची ३ मे रोजी राज्यसभेच्या खासदारकीची मुदत संपत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी नवी राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री व काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
“नवनीत राणांची तब्येत बिघडली?”; राणांच्या वकिलांचे कारागृह अधिक्षकांना पत्र
कोल्हापूर येथील प्रसार माध्यमांना बोलताना संभाजीराजे काँग्रेसमध्ये आले तर त्यांचे स्वागत केले जाईल, असे वक्तव पाटील यांनी केले. याअगोदर संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली आहे. मालोजीराजे छत्रपती हे देखील काँग्रेसचे आमदार होते. संभाजीराजे लवकरच आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याने त्यांना माझ्या शुभेच्छा, असेही पाटील म्हणाले.
खासदार संभाजीराजे हे छत्रपती घराण्यातील आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश करावा असे प्रत्येक राजकीय पक्षांना वाटते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये यावे. मात्र याबाबत आमची त्यांच्याशी कोणतीच चर्चा झालेली नाही. आतापर्यंत आम्ही संभाजीराजे यांच्याशी मराठा आंदोलन, आरक्षण, सारथी अशा विविध प्रश्नांवर चर्चा केली आहे.
“महागाई अन् बेरोजगारीचं अपयश लपवण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना सुपारी”; पटोलेंची भाजपवर खरमरीत टिका
कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत मालोजीराजे हे सक्रीयपणे प्रचारात सहभागी झाले होते. हे पाहता संभाजीराजे यांनीही काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करावा, असे आम्हाला वाटत होते. त्यासाठीही आम्ही संभाजीराजे यांना प्रचारात सक्रिय होण्याबाबत विचारले होते. त्यावेळी मालोजीराजे यांनीही प्रचारात सहभाग घेतल्याने काँग्रेसला मोठा फायदा झाला होता, अशी माहितीही पाटील यांनी सांगितले.
Read also:
- ‘भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंड बंद करा’, अबू आझमींचं राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र
- फडणवीसांना अक्कल दाड, राणे संपलेलं दुकान, तर ओवेसी देश विघातक; विनायक राऊतांची जोरदार फटकेबाजी
- “अशांतता माजवणाऱ्यांना जनता थारा देणार नाही”; रोहित पाटलांनी राज ठाकरेंना सुनावलं
- “राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर त्यांचा सूर” अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं
- राजकारण तापलं! “ओळख ना पाळख..भटमान्य टिळक म्हणत संभाजी ब्रिगेडची राज ठाकरेंवर टिका
- “संजय राऊतांचा बाबरी मशिदीशी काय संबंध”; राऊतांच्या टीकेला आशिष शेलारांचं उत्तर