मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या औरंगाबाद येथील सभेत मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी 4 तारखेपासून मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत तर मशिदींसमोर भोंगे लावून दुप्पट आवाजात हनुमान चालीसाचं पठण केलं जाईल, असा इशारा दिला आहे. त्यांच्या या आव्हानावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी सडकून टीका केली. राज ठाकरे यांनी आपल्या औरंगाबाद येथील भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. याच टीकेचा धागा पकडत अबू आझमी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांनी राज्य सरकारने राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याती विनंती केली.
“एकाला मुख्यमंत्री पद गेल्याचं दुःख, तर दुसऱ्याला भाऊ मुख्यमंत्री झाल्याचं दुःख झालं”
अबू आझमी नेमकं काय म्हणाले?
“शरद पवार यांच्या पायाखालच्या वाळूइतकी पण राज ठाकरेंची लायकी नाही. शरद पवार हे फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाचे एक ज्येष्ठ नेता आहेत. ते बडे नेते आहे. त्यांना मी सांगेन की, अशा भुंकणाऱ्यांचे तोंड बंद करा. हे संविधानच्या विरोधात बोलतात. मशिदींवरील भोंग्यांना संविधानाने परवानगी दिली आहे, सु्प्रीम कोर्टाने मशिदींवर लाऊड स्पिकर लावण्यासाठी परवानगी दिली आहे तर हे आहेत तरी कोण अशाप्रकारची भाषा करणारे?”, असा सवाल अबू आझमींनी केला.
“नवनीत राणांची तब्येत बिघडली?”; राणांच्या वकिलांचे कारागृह अधिक्षकांना पत्र
“ज्या मशिदींमध्ये लाऊड स्पिकरच्या आवाजांची मर्यादा जास्त आहे तिथे सरकारने कारवाई करावी. त्यांना सरकारने समजवावं. पण फक्त मशिदींवरच का? कारण लाऊड स्पिकर फक्त मशिदींवर नाही वाजत. लाऊड स्पिकर 50 ठिकाणी वाजतात. त्यामुळे प्रचंड ध्वनी प्रदुषण होतं. पण राजकारणात ज्या लोकांना जनतेने नाकारलं आहे, ते लोक आपल्या राजकीय जागेसाठी प्रयत्न करत आहेत. कोणत्याही प्रकारे आपलं राजकारणात पुन्हा स्थान प्रस्थापित व्हावं, असा त्यांचा प्रयत्न आहे ते लोकं मशिदींच्या भोंग्यावर बोलत आहेत”, असं आझमी म्हणाले.
Read also:
- फडणवीसांना अक्कल दाड, राणे संपलेलं दुकान, तर ओवेसी देश विघातक; विनायक राऊतांची जोरदार फटकेबाजी
- “अशांतता माजवणाऱ्यांना जनता थारा देणार नाही”; रोहित पाटलांनी राज ठाकरेंना सुनावलं
- “राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर त्यांचा सूर” अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं
- राजकारण तापलं! “ओळख ना पाळख..भटमान्य टिळक म्हणत संभाजी ब्रिगेडची राज ठाकरेंवर टिका
- “संजय राऊतांचा बाबरी मशिदीशी काय संबंध”; राऊतांच्या टीकेला आशिष शेलारांचं उत्तर
- प्रशांत किशोर यांची राजकारणात एंट्री, काढणार स्वत:चा पक्ष…!