मुंबई – खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात असून त्यांची तब्येत ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे. राणांच्या वकिलांनी कारागृह अधिक्षकांना पत्र लिहून त्यांच्या उपचारासाठी तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. खासगी रुग्णालयात उपचार करण्यात यावेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नवनीत राणा व रवी राणा यांच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
“तुमचे आमदार निवडून यावे म्हणून तुम्ही जातीय विष पसरवलं”; राज ठाकरेंची शरद पवारांवर टिका
नवनीत राणा व रवी राणा हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाने नुकतेच या दोघांनाही घरचं जेवण नाकारलं आहे. त्यातच आता नवनीत राणा यांची प्रकृती ठीक नसल्याचे समोर आले आहे. खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी कारागृह अधिक्षकांकडे केली आहे.
नवनीत राणा यांना मणक्याचा त्रास आहे. न्यायालयीन कोठडी मध्ये असताना जमिनीवर बसवण्यात आल्याने आणि झोपावे लागत असल्याने त्रास वाढला आहे. सिटी स्कॅन करायला तुरुंग अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे. जर नवनीत राणा यांना काही झालं तर तुम्ही त्याला जबाबदार असाल, असं वकिलांनी पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे तात्काळ आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
राज ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच मशिदीवरील अजाण सुरू झालं; अन् राज भडकले
नवनीत राणा यांना २७ तारखेला उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे राणा यांचा सिटिस्कॅन करण्यात यावा, असे सांगितले होते. याबद्ददल कारागृहातील अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले. वेदना असह्य झाल्याने नवनीत राणा यांचा सिटिस्कॅन करण्यात आला. नवनीत राणा यांच्याबाबत हलगर्जी पणा केला. याबाबत संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राणा यांनी वकिलांमार्फत केली आहे. या पत्राची एक प्रत लोकसभा अध्यक्ष आणि राज्याच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांना पाठवली आहे.
Read also:
- ‘तोंड आम्हालाही आहे.आम्हीही..” राज ठाकरेंना इम्तियाज जलील यांचा इशारा
- “छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा”; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अमृता फडणवीसांची मिश्किल टिप्पणी
- ‘कालचं भाषण म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत’
- “विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय, त्यांनी त्यांचा अंत करावा”; राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
- “सगळ्यांना पवार साहेबांच्या राजकारणाचा कंटाळा आला”; निलेश राणेंची पवारांवर जहरी टिका