मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल मुंबईत बुस्टर डोस सभा पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काल शिवसेनेला रावणाची उपमा दिली. तसेच त्यांनी बाबरी मशिदीवरून देखील शिवसेनेवर जोरदार प्रहार केलाय. यावरून आता राज्यात राजकीय वातावरण चांगलचं पेटण्याची शक्यता आहे. याचाच धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरेंच्या ताफ्याचा अपघात! 7 ते 8 गाड्या एकमेकांवर आदळल्या
ज्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते चुकीचं बोलत आहेत. त्यांना रामायण वाचलं पाहिजे. रावणाचाही इतिहास पाहिला पाहिजे. रावणाचा अंत अहंकारामुळे झाला. रावण हुशार आणि विद्धान होता. तो अहंकाराने गेला. काही लोकांना सत्ता असल्याचा अहंकार असतो, तर काहींना सत्ता गेमवल्यातूनही अंहकार निर्माण होतो. आता कोणत्या अंहकारातून कोण कुणाला रावण म्हणतो. ते पाहिलं पाहिजे. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारला आहे. त्यांनी त्यांचा अंत करावा अशी खोचक टिप्पणी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लावली आहे.
“तुमचे आमदार निवडून यावे म्हणून तुम्ही जातीय विष पसरवलं”; राज ठाकरेंची शरद पवारांवर टिका
भोंग्यांच्या मुद्दयावर ओरडण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर बोला, असा त्यांनी विरोधी पक्षावर घणाघात देखील केला आहे. संजय राऊत बाबरी पडली तेव्हा सेना कुठे होती विचारणारे अज्ञानी राज ठाकरेंच्या भोंग्याला पॉवर कुणाची?असा टोला देखील त्यांनी लगावला. तसेच महाराष्ट्र लेचापेचाचं राज्य नाही, कायद्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणालेत.
“नास्तिक बोललेलं पवारांना झोबलं, अन् त्यांनी देवाची पुजा करतानाचे फोटो काढले “; राज ठाकरे
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टिका करताना म्हटले होते की, भोंगे उतरवायला ज्यांची हातभार फाटते, ते म्हणतात आम्ही बाबरी पाडली. काय विनोद आहे ? बाबरी पाडल्याबद्दल ज्या 32 नेत्यांमध्ये आरोपपत्र दाखल झाले त्यात तुमचा एक महाराष्ट्राचा नेता दाखवा. ज्यात 32 नावे आरोपींच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, कल्याणसिंग, उमा भारती, विनय कटियार, साध्वी साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपालदास, रामविलास वेदांती, जयभागसिंग पवैया, आचार्य धर्मेंद्र यांची नावे देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती.
Read also:
- “सगळ्यांना पवार साहेबांच्या राजकारणाचा कंटाळा आला”; निलेश राणेंची पवारांवर जहरी टिका
- राज ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच मशिदीवरील अजाण सुरू झालं; अन् राज भडकले
- “मार्केटिंगचा जमाना भोंगेधारी, पुंगीधारी”; उद्धव ठाकरेंचा भाजप-मनसेवर निशाणा
- “ईडीची पिडी टाळण्यासाठी अन् भाजपला खुश करण्यासाठी राज ठाकरेंची सभा”; धनंजय मुंडेची खोचक टिप्पणी
- भोंगा कमळाला किती त्रास देतोय, ते आगामी काळात दिसेल;” शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला
- राज ठाकरेंच्या ताफ्याचा पुन्हा अपघात; पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर थोडक्यात बचावले