मुंबई : आज संपुर्ण राज्यात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद याठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होत आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील मुंबईत बुस्टर डोस सभा म्हणूून होत आहेत. अशातच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता त्यांनी मनसे आणि भाजपवर जोरदार टिका केली आहे.
“आमच्यापेक्षा जास्त वेळ घेऊन हनुमान चालिसा वाचून दाखवा”; धनंजय मुंडेंचं विरोधकांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील जोरदार टिका केली. रिकाम्या थाळ्या वाजवून कोरोना गेला नाही. मार्केटिंगचा जमाना भोंगेधारी, पुंगीधारी मार्केटिंग करता असंही ते म्हणाले. भोंग्याचा विषय गाजलेला वाटत नाही, असे खेळ खुप पाहिले, मला माझ्या जनतेच्या जिवाची पर्वा आहे, केंद्राने भोंग्याबाबत धोरण ठरवावं. असंही ते म्हणाले.
“ज्यांनी म्हटलं होतं सरकार पडेल, त्यांना आता काय वाटतं, ते मला माहिती नाही”
पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचं कौतुक करण्याचा मोठेपणा राज ठाकरे यांच्यामध्ये नाही. ते स्वत: अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदुत्वाचा डंका आम्हाला वाजवावा लागत नाही, शिवसेनेने कधीचं झेंडा बदलला नाही, मराठीनंतर आता हिंदुत्वाचा खेळ सुरू झाला आहे. आम्ही वाईट कारभार करत असू तर जरूर आम्हाला जनतेसमोर उघडं पाडा. मात्र, भाजपने कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्न विचारला होता. आता त्यांना विचारण्याची गरज आहे की, महाराष्ट्राची संस्कृती पाहता भाजपाने महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवलाय? ही सुडबुद्ध तुमच्यात कोठून आली, ही कोणती संस्कृती आहे, तुमच्या रक्तात सुडबुद्धी कशी आली, हा विकृतपणा तुमच्याकडे कसा आला? असा सवाल देखील त्यांनी विचारला.
“ये रिश्ता क्या कहता है..! भाभीजी युसुफ लकडावाला से क्या ले रही है”
दरम्यान, औरंगाबाद येथे राज ठाकरे यांच्या सभेसाठी सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यासंदर्भात पाोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी माहिती दिली आहे. शहरात कुठेही वाद, भांडण दिसले तर नागरिकांनी हेल्पलाईन 112 वर संपर्क करावा. तसेच शहरात 750 सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणांहुन राज ठाकरे यांच्या सभेसाठी कार्यकर्ते दाखल झाले आहेत.
Read also:
- “ईडीची पिडी टाळण्यासाठी अन् भाजपला खुश करण्यासाठी राज ठाकरेंची सभा”; धनंजय मुंडेची खोचक टिप्पणी
- भोंगा कमळाला किती त्रास देतोय, ते आगामी काळात दिसेल;” शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला
- राज ठाकरेंच्या ताफ्याचा पुन्हा अपघात; पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर थोडक्यात बचावले
- राज ठाकरेंच्या ताफ्याचा अपघात! 7 ते 8 गाड्या एकमेकांवर आदळल्या
- “हिरवा शालू नेसलेली राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस सुर्यादय होण्याअगोदर लगेच त्यांच्या अंगावर भगवा शालू आला”