मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याची सभा त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभा आणि औरंगाबाद याठिकाणी होत आहेत. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचा दिलेला अल्टिमेटमला देखील आता संपत आला आहे. तसेच राज्यात आज ठिकठिकणी राजकीय नेत्यांच्या सभा होत आहेत. याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
“ज्यांनी म्हटलं होतं सरकार पडेल, त्यांना आता काय वाटतं, ते मला माहिती नाही”
धनंजय मुंडे म्हणाले की, राज ठाकरे यांची सभा म्हणजे स्वत: चे काहीही झाकण्यासाठी आहे. आधी ते केंद्राविरोधात बोलायचे. पंरतु पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना देशाच्या राजकीय पटलावरून हटवले पाहिजे, अशी मागणी करणारा माणून आज त्यांचेच गुणगाण गात आहे. त्यामुळे काहीतरी गडबड आहे. राज ठाकरे यांची सभा ही भाजप पुरस्कृत आहे, हे काही नव्याने सांगण्याचा गरज नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला.
“ये रिश्ता क्या कहता है..! भाभीजी युसुफ लकडावाला से क्या ले रही है”
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभा पुरस्कृत आहे. ईडीची पिडी टाळण्यासाठी राज ठाकरे सभा घेऊन भाजपला खुश करत आहेत. आधी ते केंद्राविरोधात सभा घ्यायाचे. आता ते महाविकास आघाडीविरोधात सभा होत आहेत. त्याने काहीही फरक पडणार नाही. स्वत: चे काहीतरी झाकण्यासाठी अशा सभांचे आयोजन केले जात आहे. असंही ते म्हणाले.
“दंगली पसरू देऊ नका, शांतता व सलोखा राखा”; राज ठाकरेंच्या सभेपुर्वी वंचितचा कार्यकर्त्यांना आवाहन
दरम्यान, याठिकाणी राज्यातील अनेक ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेसाठी औरंगाबाद येथे 2 हजार पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आहे. तसेच शहरातील वाहतूकीत देखील मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेकडे सध्या सगळ्यांचचं लक्ष लागून राहिलं आहे.
Read also:
- भोंगा कमळाला किती त्रास देतोय, ते आगामी काळात दिसेल;” शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला
- राज ठाकरेंच्या ताफ्याचा पुन्हा अपघात; पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर थोडक्यात बचावले
- राज ठाकरेंच्या ताफ्याचा अपघात! 7 ते 8 गाड्या एकमेकांवर आदळल्या
- “हिरवा शालू नेसलेली राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस सुर्यादय होण्याअगोदर लगेच त्यांच्या अंगावर भगवा शालू आला”
- “आमच्यापेक्षा जास्त वेळ घेऊन हनुमान चालिसा वाचून दाखवा”; धनंजय मुंडेंचं विरोधकांना आव्हान