मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज बहुचर्चित औरंगाबाद याठिकाणी सभा होत आहे. त्यासाठी राज ठाकरे हे काल औरंगाबाद याठिकाणी दाखल झाले आहेत. राज्यातील विविध कार्यकर्त्ये देखील राज ठाकरे यांच्या सभेसाठी औरंगाबाद याठिकाणी दाखल झाले आहेत. याच पार्श्वभूमिवर शिवसेने नेते सुभाष देसाई यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टिप्पणी केली आहे.
“ये रिश्ता क्या कहता है..! भाभीजी युसुफ लकडावाला से क्या ले रही है”
आधी मराठी-मराठी केलं आणि आता भोंगा-भोंगा करत आहेत. भुंगा आणि कमळाचं नातं असतं, हे मला माहित होतं. मात्र आता भोंगा आणि कमळाचं नातं पाहायला मिळत आहे. भोंगा कमळाला किती त्रास देतोय, ते आगामी काळात दिसेल असा इशारा देखील सुभाष देसाई यांनी राज ठाकरे यांना दिला.
“दंगली पसरू देऊ नका, शांतता व सलोखा राखा”; राज ठाकरेंच्या सभेपुर्वी वंचितचा कार्यकर्त्यांना आवाहन
सभेच्या ठिकाणी कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून राज ठाकरे यांच्या सभेसाठी आज औरंगाबादमध्ये 2 हजाराचां पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच राज ठाकरे यांच्या सभेसाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे शहरात दुपारी 2 वाजल्यापासून वाहतुकित बदल करण्यात आला आहे.
“मुख्यमंत्र्यांची अवस्था सध्या गजनीसारखी”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याला मनसेकडून प्रत्युत्तर
दरम्यान, जूनी मल्टिपर्पज शाळा ते नारळी बाग, आयटीआय ते खडकेश्वर टी पॉंइट, ज्युबली पार्क ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानाकडे जाणारा रस्ता, आशा ऑप्टिकल ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानाकडे जाणारा रस्ता या मार्गांवर वाहन बंदी असणार आहे. राज ठाकरे यांचा मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी स्वागत केला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामाच्या घोषणा देखील दिल्या.
Read also:
- राज ठाकरेंच्या ताफ्याचा पुन्हा अपघात; पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर थोडक्यात बचावले
- राज ठाकरेंच्या ताफ्याचा अपघात! 7 ते 8 गाड्या एकमेकांवर आदळल्या
- “हिरवा शालू नेसलेली राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस सुर्यादय होण्याअगोदर लगेच त्यांच्या अंगावर भगवा शालू आला”
- “आमच्यापेक्षा जास्त वेळ घेऊन हनुमान चालिसा वाचून दाखवा”; धनंजय मुंडेंचं विरोधकांना आव्हान
- “ज्यांनी म्हटलं होतं सरकार पडेल, त्यांना आता काय वाटतं, ते मला माहिती नाही”