मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यात चर्चेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. नवनीत राणा यांचा अंडरवल्ड कनेक्शन असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दाऊदशी संबंधी युसुफ लाकडवाला यांचा नवनीत राणा यांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्याचाच धागा पकडत शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
“राज ठाकरे बाळासाहेबांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन, त्यांच्या ज्वालांमध्ये कोण कोण भस्स होणार?
मनिषा कायंदे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस ह्या युसुफ लाकडवाला यांच्याकडून काहीतरी भेट वस्तू स्विकारताना दिसत आहेत. त्यावरून ये रिश्ता क्या कहता है… भाभीजी युसुफ लकडााला से क्या ले रही है, अस म्हणत त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर खोचक टिप्पणी केली.
“राज ठाकरे यांनी सभेपुर्वी इफ्तार पार्टीला यावं”; इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना आमंत्रण
तसेच पुढे त्यांनी मुंबई हल्ल्याचा आरोप दाऊदचा माणूस- युसुफ लकडावाला आणि या बाई कोण हे काही सांगायला हवे का? लकडावालाकडून वहिनी काय घेत असाव्या बरे? आता यांना कोणता न्याय लावावा? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केली आहे.
“राजकीय खेळात अनेकजण उंच उड्या मारण्याचा प्रयत्न करताहेत”; मनसे-भाजप युतीबाबत भुजबळांची प्रतिक्रिया
दरम्यान, सत्ताधारी पक्षातील अनके नेत्यांकडून युसुफ लकडावाला यांच्यासंबंधी राजकीय नेत्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यानंतर विरोधी पक्षांनी देखील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत देखील युसुफ लकडावाला यांचा फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे याप्रकऱणावरून सध्या जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे.
ये रिश्ता क्या कहता हैं..
भाभीजी युसुफ लकडावाला से क्या ले रही है…?#AmrutaFadnavis #Lakdawala #BJP #BJP_हटाओ_देश_बचायो #BJPfails@fadnavis_amruta @Dev_Fadnavis @ShivsenaComms @BJP4Mumbai @MohitKambojBJP @PMOIndia @OfficeofUT @navneetravirana @AUThackeray pic.twitter.com/NGKtEWtawj— Dr.ManishaKayande (@KayandeDr) April 30, 2022
Read also:
- “दंगली पसरू देऊ नका, शांतता व सलोखा राखा”; राज ठाकरेंच्या सभेपुर्वी वंचितचा कार्यकर्त्यांना आवाहन
- “मुख्यमंत्र्यांची अवस्था सध्या गजनीसारखी”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याला मनसेकडून प्रत्युत्तर
- विरोधकांचा समाचार, तर हिंदुत्वाचा ज्वलंत मुद्दा, राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत काय बोलणार?
- “…मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील”; संजय राऊतांचा विरोधकांना सुचक इशारा
- “राष्ट्रवादी ही चाळीस चोरांची टोळी, त्यांच्या गुहेत दोन चोरांचे साथीदार”; खोतांचा पुन्हा एकदा टोला