IMPIMP

“राज ठाकरे यांनी सभेपुर्वी इफ्तार पार्टीला यावं”; इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना आमंत्रण

imtiaz-jalil-invites-raj-thackeray-for-iftar-party

औरंगाबाद :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबाद याठिकाणी सभा होत आहे. त्यासाठी राज ठाकरे हे औरंगाबादला निघाले असल्याची माहिती समोर येत आहे. त्याआधी मनसे अध्यक्ष 100 ते 150 पुरोहितांचा आशीर्वाद घेणार असल्याचे वक्तव्य पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाई बाबर यांनी केलं आहे. तत्पुर्वी एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचं आमंत्रण दिलं आहे.

“भाजप-मनसे युती झाली की नाही, तेच समजत नाही”; अजित पवारांची युतीसंदर्भात मिश्किल टिप्पणी 

राज ठाकरे यांच्या सभेपुर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची भेट घेतली. औरंगाबाद आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे की कोणताही सण साजरा करतो. त्यावेळी सर्वजण मिळून करतो. पोलीस आयुक्तांना शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी आमची मदत लागणार असली तर करण्यास तयार आहोत. असंही त्यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांची औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होत आहे. साडे सात वाजता तुमची सभा आहे. त्यापुर्वी हिंदु मुस्लीम एकतेसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. हिंदु मुस्लिम एकत्र येूऊन इफ्तार करू, त्यामध्ये सहभागी होऊ असं जलील यांनी म्हटलं आहे.

“भाजप मनसेच्या युतीसंदर्भात संघ कधीही पुढाकार घेणार नाही”; भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचा दावा 

रमजानच्या महिन्याची प्रतीक्षा मुस्लीम व्यक्ती वर्षभर करत असतो. सर्व जातीधर्माच्या लोकांना त्यांच्या व्यवसायाचं काय होणार याची काळजी आहे. औरंगाबादच्या जनतेला माझं आवाहन आहे की सर्वजण मिळून सोबत जाऊया. सर्व समाजातील 99 टक्के लोकांना शांततेच्या मार्गानं जायचं असतं. 1 टक्के लोकांवर पोलिसांनी नियत्रण ठेवाव, असं आवाहान देखील जलील यांनी केलं आहे.

“मंत्री जेलमध्ये तरीही महाराष्ट्र शासनाने निर्णय जाहीर केलाय”; निलेश राणेंची राज्य सरकारवर खोचक टिप्पणी 

दरम्यान, राज ठाकरे यांच्या या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. त्यांच्या सभेला अनेकांनी विरोध केला असून भीम आर्मी सभा उधळून लावणार असल्याच्याही बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे त्यादिवशी नेमकं काय घडणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Read also:

Total
0
Shares
Previous Article
bhujbals-reaction-regarding-mns-bjp-alliance

"राजकीय खेळात अनेकजण उंच उड्या मारण्याचा प्रयत्न करताहेत"; मनसे-भाजप युतीबाबत भुजबळांची प्रतिक्रिया

Next Article
sadabhau-khot-comment-on-raj-thackeray-and-balasaheb-thackeray

"राज ठाकरे बाळासाहेबांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन, त्यांच्या ज्वालांमध्ये कोण कोण भस्स होणार?

Related Posts
Total
0
Share