मुंबई : हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जो 2019 मध्ये 28 नोव्हेंबरला सत्तेच्या मोहात खंडित झाला होता. तोच विचार त्याचा वारसा चालवत राज ठाकरेंनी पुढे नेण्याचा संकल्प केला आहे. आमची युती शिवसेनेच्या तत्कालीन देशभक्तीच्या विचाराशी होती. आता शिवसेनेचा विचार सोनिया गांधी आणि काॅंग्रेसला मदत कऱण्याचा विचार असल्याने संदर्भामध्ये भाजप-शिवसेना युती होणं शक्य नाही, असं स्पष्ट मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलं आहे.
त्याचबरोबर त्यांनी मनसेने राष्ट्रभक्तीची, देशभक्तीची, हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात मनसे भाजप युती होणार असल्याची चर्चा रंगली आहे. सध्या तरी याविषयी कोणतही चिंतन, मंथन, चर्चा आणि तर्कही नाही, असं म्हणत त्यांनी मनसे-भाजप युतीवर देखील प्रकाश टाकला. त्यामुळे मागील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मनसे भाजप युतीला सुधीर मुनगंटीवार यांनी पुर्णविराम दिला आहे.
“आम्ही नियमाचं पालन करणार, मात्र जे करणार नाही, त्यांचं काय? मनसेकडून राज्य सरकारला सवाल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही यूतीच्या संदर्भात कोणतीही चर्चा करत नाही. देशहितासाठी स्वयंसेवक घडवण्याचं काम आरएसएस करत असतं. भारतमातेच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करतो. असं म्हणत त्यांनी संघाचं कौतुक करत विरोधकांना जोरदार टोला लगावला. भाजप मनसे युती होणार यात आरएसएस संघाचा हात असणार का? यावर त्यांनी आपले विचार मांडले. खुर्ची, राजकीय सत्ता या साऱ्या बाबी संघासमोर गौण आहेत. त्यामुळे भाजप मनसेच्या युतीसंदर्भात राष्ट्रीय स्वंयसेवक संघ कधी पुढाकार घेणे किंवा मध्यस्थी म्हणून कार करणार नाही. त्यामुळे मनसेसोबत युती होणे सध्या तरी शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, अलिकडील मनसेच्या राजकीय घटनांवरून राज्यात मनसे भाजप सोबत युती करणार असल्याचं चित्र निर्माण झालं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका आणि त्याला भाजपने दिलेला पाठिंबा हे सर्व युतीचे संकेत होते. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी हे सर्व संकेत खोडून काढले. त्याआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
Read also:
- “मंत्री जेलमध्ये तरीही महाराष्ट्र शासनाने निर्णय जाहीर केलाय”; निलेश राणेंची राज्य सरकारवर खोचक टिप्पणी
- “पुरी ताकद से बताएं, पेट्रोल के दाम कम हुए के नहीं हुए ! इंधन दरवाढीबाबत राष्ट्रवादीचं अनोखे आंदोलन
- “पंतप्रधानांनाकडून सावत्रपणाची वागणूक मिळतेय”; संजय राऊतांची नरेंद्र मोदींवर टिका
- अकलेचा अन् तुमचा काडीचा तरी संबंध आहे का? आले चॅनलचे बूम अन् ठोकली धूम
- ऐ मनके “रोगी” तु भी ईलाज करले हमारे “कर्मयोगी”से ; अमृता फडणवीसांना युवासेनेचे जोरदार प्रत्युत्तर