पुणे : सध्या देशात उन्हाच्या झळा अन् महागाईच्या कळा सहन करता करता सर्वसामान्य लोकांचं जीव मेटाकुटीला येऊन गेलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती देशात झपाट्याने वाढत आहेत. गॅस, सिलेंडरच्या किंमती गगणाला भि़डल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखलेलं महागाईवरील स्वप्न ते स्वप्न राहिलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पुण्यातील गुडलक चौकात नरेंद्र मोदी यांचं जुने भाषण ऐकवत आंदोलन केलं.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीत पेट्रोलल- डिझेल दरवाढी बाबत एक भाषण केलं होतं. तेच भाषण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भोंग्यावर लावत अनोख्या पद्धतीने दरवाढीबाबत निषेध व्यक्त केला.
“शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीशी युती केली नाही, त्याची चुक आम्ही भोगतोय”; सुधीर मुनगंटीवारांची खंत
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की, 2014 साली पेट्रोल 60 आणि गॅस 400 रूपयांच्या आसपास होती. आता हेच सात वर्षात दरवाढ होत आहे. पेट्रोल 120 आणि गॅस हजाराच्या घरात गेले आहे. यामुळे आता कसं जगायचे असा प्रश्न देखील सर्व सामान्य लोकांना पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी अनेक सभा घेत महागाईवर भाषणं केली आणि आता त्यांना महागाईचा विसर पडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आम्ही आज भोंग्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पेट्रोल-डिझेल वरील भाषण लावून आंदोलन करीत आहोत. असंही ते म्हणाले.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत अजित पवार लवकरच गुड न्युज देणार! म्हणाले, पुढच्या दोन तीन महिन्यात..;
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली अशाच प्रकारे आंदोलन सुरू आहे. आपका फायदा हुआ का नहीं हुआ. मुझे बताएं, ऐसे नहीं पुरी ताकद से बातएं, पेट्रोल के दाम कम हुए के नहीं हुए. डिझेल के दाम कम हुए के नहीं हुए, अशा प्रकारच्या नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील क्लिप काढून त्या भोंग्यावर लावलं जात आहे.
Read also:
- “पंतप्रधानांनाकडून सावत्रपणाची वागणूक मिळतेय”; संजय राऊतांची नरेंद्र मोदींवर टिका
- अकलेचा अन् तुमचा काडीचा तरी संबंध आहे का? आले चॅनलचे बूम अन् ठोकली धूम
- ऐ मनके “रोगी” तु भी ईलाज करले हमारे “कर्मयोगी”से ; अमृता फडणवीसांना युवासेनेचे जोरदार प्रत्युत्तर
- “भाजपला नाटक करुनच ‘पुन्हा येण्याचं’ गुळगुळीत स्वप्न साकारायचं असेल तर..;” रोहित पवारांचा भाजपला सल्ला
- “आम्ही नियमाचं पालन करणार, मात्र जे करणार नाही, त्यांचं काय? मनसेकडून राज्य सरकारला सवाल