पुणे : मागील काही दिवसापुर्वी काश्मीर फाईल्स चित्रपटांवरून बराच वाद झाला होता. काश्मीर पंडितांवर झालेल्या अत्याचार संबंधी चित्रपट असल्याने संपुर्ण राज्यात हा चित्रपट टॅक्समुक्त करावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. मात्र भाजपच्या या मागणीला राज्य सरकारने केराची टोपली दाखवली होती. अशातच आता केजीएप आणि आरआरआर या चित्रपटांवरून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवारांनी भाजवर निशाणा साधला आहे.
“मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती, तर राज ठाकरेंनी पवार साहेबांना ‘जातीयवादी’ म्हटले असते का?”
कसदार स्टारकास्ट सोबतच कथेत सामान्य माणसाचं हित दाखवण्याचा प्रयत्न असल्याने केजीएफ आणि आरआरआऱ सारखे दाक्षिणात्य चित्रपट हिट होतायेत. पण सध्या राज्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र भाजपच्या नव्या चित्रपटात राजकारण सोडून जनतेचं हित कुठंच दिसत नाही. उलट या नव्या स्टारकास्टची लबाडी रोज उघड होतेय. परिणामी भाजपचा सध्याचा चित्रपट फ्लॉप ठरतोय. म्हणूनच इतरांना तर सोडाच पण स्वतःच्याच १०६ मधील बहुतांश लोकांनीही या चित्रपटाकडं पाठ फिरवल्याचं दिसतंय. असंही रोहित पवार म्हणाले.
राणा दाम्पत्याविरोधात आणखी एक ‘व्हिडीओ बॉम्ब’ फुटणार! शिवसेना खासदारांनी दिला ‘हा’ इशारा
त्यामुळं कदाचित पुढील चित्रपटात स्टारकास्ट बदललीही जाईल परंतु स्टारकास्ट बदलल्याने चित्रपट हिट होईलच असं नाही. त्यासाठी मुळातच कथेत दम आणि सामान्य माणूस नायक असावा लागतो. पण भाजपाकडून फक्त राजकीय नाटकंच सुरूय. भाजपला नाटक करुनच ‘पुन्हा येण्याचं’ गुळगुळीत स्वप्न साकार करायचं असेल तर यानिमित्ताने का होईना भविष्यात नायक म्हणून सामान्य माणूस आपल्या कथेत दाखवला जाईल का? हा खरा प्रश्न आहे. असा टोला देखील त्यांना लगावला आहे.
राज्यात लवकरच निवडणुकांचा धुरळा उडणार! ‘या’ तारखांना उमेदवारांच्या अंगावर गुलाल उधळणार ?
दरम्यान, काश्मिर फाईल्स चित्रपटांवरून राज्यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये बराच राजकीय वाद- विवाद घडून आला होता. काश्मिर फाईल्स चित्रपट बघण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी लोकांना आव्हान देखील केलं होतं. तसेच अनेक भाजपच्या नेत्यांनी चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पाहिला होता.
Read also:
- “आम्ही नियमाचं पालन करणार, मात्र जे करणार नाही, त्यांचं काय? मनसेकडून राज्य सरकारला सवाल
- “अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरेंनी योगींचं अभिनंदन करण्याआधी माहिती घ्यायला हवी”; मनिषा कायंदे
- “शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीशी युती केली नाही, त्याची चुक आम्ही भोगतोय”; सुधीर मुनगंटीवारांची खंत
- पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत अजित पवार लवकरच गुड न्युज देणार! म्हणाले, पुढच्या दोन तीन महिन्यात..;
- “ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से”! अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला