मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं भरभरून अभिनंदन आणि आभार मानले आहेत. उत्तर प्रदेशमधील मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचा योगी सरकारने निर्णय घेतला आहे. त्यावरून राज ठाकरे यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सरकारवर आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. तर यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे.
देशातील वातावरण बिघडण्याचे काम होत असेल तर..; शरद पवारांनी विरोधकांना दिला ‘हा’ इशारा
अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधतान म्हटलं आहे की,ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से. त्यावर आता विरोधक काय प्रतिक्रिया देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे. उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील , विशेषता:मशिदीवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. असं त्यांनी ट्विट करत योगीचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसेच अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबचरणी प्रार्थना. असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबाद येथे सभा होत आहे. त्या सभेत राज ठाकरे विरोधकांवर तसेच राज्यातील परिस्थितीबाबत काय बोलणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
“आजकल गदाधारी हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात, परंतु रोज टिव्हीवर..;” फडणवीसांचा शिवसेनेला टोला
दरम्यान, अलिकडेच गृहमंत्र्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत आणि राज्यातील परिस्थितीबाबत महत्वाची बैठक घेतली होती. त्या बैठकीत मशिदीवरील भोंगे कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितले. यावरून राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवर मनसे ठाम राहिले. त्यामुळे येत्या 3 मे नंतर मनसे काय भूमिका घेणार त्याकडे लक्ष आहे. तर औरंगाबाद येथे जवळपास 1601 अनधिकृत धार्मिक स्थळांवर भोंगे आहेत. त्याबाबत सरकार काय भूमिका घेणार ते पण आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से !#Maharashtra #thursdayvibes
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 28, 2022
Read also:
- “मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती, तर राज ठाकरेंनी पवार साहेबांना ‘जातीयवादी’ म्हटले असते का?”
- राणा दाम्पत्याविरोधात आणखी एक ‘व्हिडीओ बॉम्ब’ फुटणार! शिवसेना खासदारांनी दिला ‘हा’ इशारा
- राज्यात लवकरच निवडणुकांचा धुरळा उडणार! ‘या’ तारखांना उमेदवारांच्या अंगावर गुलाल उधळणार ?
- राज ठाकरे औरंगाबादमध्ये गरजणार! तर फडणवीसांची मुंबईत ‘बुस्टर डोस’ सभा; 1 मे रोजी राज्यात ‘राजकारण’ तापणार
- योगीचं कौतुक तर राज्य सरकारवर कडाडून टिका! राज ठाकरे, म्हणाले, “राज्यात योगी, नाहीतर सत्तेेचे भोगी”