मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं भरभरून अभिनंदन आणि आभार मानले आहेत. उत्तर प्रदेशमधील मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचा योगी सरकारने निर्णय घेतला आहे. त्यावरून राज ठाकरे यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सरकारवर आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
नवनीत राणांचा ‘डी गॅंगशी’ आर्थिक व्यवहार! संजय राऊतांच्या आरोपांमुळे खळबळ
उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील , विशेषता:मशिदीवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. असं त्यांनी ट्विट करत योगीचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसेच अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
आधी पाणी नाकारलं, वाद केल्यानंतर तो शांत करण्यासाठी चहा दिला का? भाजपचा राज्य सरकारला सवाल
महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबचरणी प्रार्थना. असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबाद येथे सभा होत आहे. त्या सभेत राज ठाकरे विरोधकांवर तसेच राज्यातील परिस्थितीबाबत काय बोलणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
महाराष्ट्र सरकारची बदनामी करतांना सरकारी चहाशी तरी इमान राखायचे; शिवसेनेकडून राणांना खोचक टोला
दरम्यान, अलिकडेच गृहमंत्र्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत आणि राज्यातील परिस्थितीबाबत महत्वाची बैठक घेतली होती. त्या बैठकीत मशिदीवरील भोंगे कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितले. यावरून राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवर मनसे ठाम राहिले. त्यामुळे येत्या 3 मे नंतर मनसे काय भूमिका घेणार त्याकडे लक्ष आहे. तर औरंगाबाद येथे जवळपास 1601 अनधिकृत धार्मिक स्थळांवर भोंगे आहेत. त्याबाबत सरकार काय भूमिका घेणार ते पण आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- देशातील वातावरण बिघडण्याचे काम होत असेल तर..; शरद पवारांनी विरोधकांना दिला ‘हा’ इशारा
- “मोदींनी मुळ विषय सोडून इतर विषयांवरच तारा छेडल्या”; राऊतांनी पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवरून छेडले
- “आजकल गदाधारी हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात, परंतु रोज टिव्हीवर..;” फडणवीसांचा शिवसेनेला टोला
- अखेर 18 दिवसांनी गुणरत्ने सदावर्तेंची तुरूंगातून सुटका! म्हणाले, “मी मरायला देखील तयार आहे…;”
- ..तर या अब्दुल सत्तारांना तुरूंगात डांबून दाखवा; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान