रत्नागिरी : राज्यात सध्या सत्ताधारी विरूद्ध विरोधी पक्षांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. विविध मुद्द्यांमुळे राज्यात विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडल्या जात आहे. अशातच आता भाजप नेते नितेश राणे यांनी अब्दुल सत्तार यांचा जुना व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कारवाई करण्याची मागणी केली आहे.
देशमुखांना दिलासा मिळण्याची शक्यता! गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला चांदिवाल आयोगाचा अहवाल
नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात महाविकास आघाडीतील मंत्री अब्दुल सतार हे उपस्थित असलेल्या लोकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत दिसत आहे. त्यात हनुमानाबद्दल देखील आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं दिसत आहे. या व्हिडीओ पोस्ट करत त्यावर उद्धव ठाकरे स्तव: ला मर्द म्हणातात ना ? तर या अब्दुल सत्तार यांना तुरूंगात डांबून दाखवा, असं आव्हान देखील नितेश राणे यांनी केला आहे.
उपस्थित लोकांमध्ये त्याठिकाणी काही पोलीस देखील दिसत आहेत. हा व्हिडीओ 2017 चा असल्याचा म्हटलं जात आहे. त्यावेळी शिवसेना ही महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत नव्हती. त्यामुळे या व्हिडीओमुळे राज्यात आगामी काळात काय घडामोडी घडणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
नवनीत राणांच्या आरोपांवर पोलिसांनी केला पुराव्यांसह व्हिडीओ पोस्ट! राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण चांगलाचं तापलं आहे. मशिदीवरील भोंगा, हनुमान चालिसा, भाजप नेत्यांवरील हल्ले, आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी नवनीत राणांवर केलेले आरोप सध्या चर्चेत आहेत.
Read also:
- नवनीत राणांचा ‘डी गॅंगशी’ आर्थिक व्यवहार! संजय राऊतांच्या आरोपांमुळे खळबळ
- आधी पाणी नाकारलं, वाद केल्यानंतर तो शांत करण्यासाठी चहा दिला का? भाजपचा राज्य सरकारला सवाल
- “राणांचं समर्थन करणारा राज्यातील विरोधी पक्षही तोंडघशी पडला”; संजय राऊतांचा खोचक टोला
- महाराष्ट्र सरकारची बदनामी करतांना सरकारी चहाशी तरी इमान राखायचे; शिवसेनेकडून राणांना खोचक टोला
- मोदींनीच सांगितलं की, पवारांच्या हाताला धरून राजकारण शिकलो, मग यात जातीयपणा कसला?